शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 10:34 IST

UPSC ची तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटीच राहते.

दिल्लीतील शकरपूर येथून संतापजनक तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला भाडेकरूच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये लपवलेल्या कॅमऱ्यांचा वापर करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खरे तर नागरी सेवा परीक्षेची (UPSC) तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटीच राहते. व्हिडीओ पोस्ट करणारा आरोपी करण हा घरमालकाचा मुलगा असून त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो. महिलेने सांगितले की, जेव्हा ती उत्तर प्रदेशातील तिच्या घरी गेली होती, तेव्हा तिने फ्लॅटच्या चाव्या त्याच्याकडे सोपवल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला अलीकडेच तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर काही वेगळी ॲक्टिव्हिटी दिसली आणि तिने तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटशी लिंक केलेली इतर उपकरणे तपासली असता तिला एक अनोळखी लॅपटॉप सापडला. त्यानंतर तिने लगेचच व्हॉट्सॲप लॉग आउट केले. यानंतर महिला सावध झाली आणि आपली हेरगिरी केली जात असल्याचा संशय आल्याने तिने तिच्या अपार्टमेंटची झडती सुरू केली. मग तिला तिच्या बाथरूमच्या बल्ब होल्डरमध्ये कॅमेरा लावलेला दिसला आणि तिने लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

आरोपी करणला अटकपोलीस संबंधित पीडितेच्या घरी पोहोचले असता त्यांना बेडरुमच्या बल्ब होल्डरमध्ये देखील दुसरा कॅमेरा सापडला. तिच्या खोलीत आणखी कोणी येत असे का, असे विचारले असता महिलेने पोलिसांना सांगितले की, ती कुठेतरी गेली की अनेकदा घरमालकाचा मुलगा करणकडे चाव्या देऊन जात असे. चौकशीदरम्यान करणने पोलिसांना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी ती महिला तिच्या घरी गेली होती, तेव्हा तिने खोलीच्या चाव्या त्याच्याकडे ठेवल्या होत्या. दरम्यान, करणने तीन स्पाय कॅमेरे विकत घेतले आणि एक महिलेच्या बेडरूममध्ये आणि एक तिच्या बाथरूममध्ये बसवला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे कॅमेरे ऑनलाइन वापरता येत नाहीत... मेमरी कार्डवर फुटेज साठवले जाते. त्यामुळे रेकॉर्ड केलेला व्हिडीओ लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी करणने वीज दुरुस्त करण्याच्या बहाण्याने वारंवार महिलेकडे तिच्या खोलीची चावी मागितली. आरोपी करण (३०) हा दिव्यांग असून तो आता कायदेशीर प्रक्रियेतून जात आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी