शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कोलकातातील ‘त्या’ हॉस्पिटलवर ४० समाजकंटकांच्या टाेळीचा हल्ला; रुग्णालयाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 05:15 IST

अनेक पोलिसांसह आंदाेलकांनाही मारहाण

कोलकाता : कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येमुळे चर्चेत आलेल्या आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलवर ४० समाजकंटकांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री अचानक हल्ला केला. पोलिसांना मारहाण करण्याबरोबर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हल्लेखोरांनी आंदोलनाला बसलेल्यांनाही मारहाण केल्याचा  दावा डॉक्टरांनी केला आहे. 

या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ४० लोक आंदोलकांच्या रूपात मुखवटा धारण करून रुग्णालयाच्या आवारात घुसले आणि तेथे आंदोलकांनी बांधलेले स्टेज नासधूस करू लागले. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांवरही त्यांनी दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र हे समाजकंटक रुग्णालयात शिरले आणि त्यांनी लाठ्या, विटा आणि रॉडने बाह्य रुग्ण विभागासह (ओपीडी) इमर्जन्सी वॉर्ड, त्याचे नर्सिंग स्टेशन आणि औषध दुकानाची तोडफोड केली. या हल्लेखोरांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेदेखील नष्ट केले. पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच  महिला डॉक्टर हत्येच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  गुन्हेगारांना कडक शिक्षेबरोबरच रुग्णालयातील महिला सुरक्षेच्या मागणीसाठी देशभरात निषेध आंदोलन सुरू आहे. मात्र या परिस्थितीत कार हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच अशी हल्ल्याची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचा आरोप विविध वैद्यकीय कर्मचारी संघटनांनी केला आहे.

हल्ल्यामागे विरोधक : ममता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथील हॉस्पिटलवरील हल्ल्याचा निषेध करताना यामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप केला. अशा घटनांद्वारे भाजप आणि डाव्या पक्षांचे काही बाहेरील नेते बंगालमध्ये अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, सीसीटीव्ही फुटेजवरून हल्ल्याच्या मुळाशी जाता येईल. या हल्ल्यात रुग्णालयाचे दोन मजल्यांचे नुकसान झाले असून ते पूर्ववत होण्यासाठी तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टर हत्येप्रकरणातही संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्यात आली आहेत.

आमचे मनोधैर्य आणखी वाढलेय

हल्ला म्हणजे आंदोलक डॉक्टरांचे मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न असून आम्ही आंदोलनातून माघार घ्यावी, अशी काहींची इच्छा आहे. पण या हल्ल्याच्या घटनेने उलट आमचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे, असे एका आंदोलक डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरwest bengalपश्चिम बंगाल