शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर प्रेयसीने त्याचे गुप्तांग कापले; तिने रडत रडत पोलिसांना फोन केला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:39 IST

मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्याने महिला डॉक्टर संतापली होती.

प्रेमात फसवणूक करणाऱ्या प्रियकराला धडा शिकवताना प्रेयसीने धक्कादायक कृत्य केले. लग्नास विरोध केल्याने संतापलेल्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या गुप्तांगावर हल्ला केला. बिहारमधील छपरा जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ माजली. येथील एका महिला डॉक्टरने प्रियकर नगरसेवकावर जीवघेणा हल्ला केला. तिने त्याचे गुप्तांग कापून गंभीर जखमी केले. संबंधित महिला डॉक्टरने व्हिडीओ शेअर करत आपल्या चुकीची कबुली दिली आहे. ती म्हणाली की, असे करून तिने तिच्या प्रियकराला त्याच्या उद्धटपणाची शिक्षाच दिली नाही तर त्याची अशी अवस्था केली आहे की, आता तो आयुष्यभर इतर कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब करू शकणार नाही.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. रक्तस्त्राव होताच घाबरलेल्या तरूणीने इतरत्र फोन करून मदत मागितली. मग प्राथमिक उपचारांनंतर पोलिसांनी जखमी नगरसेवकाला जवळच्या रूग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. 

महिला डॉक्टरचे धक्कादायक कृत्य माहितीनुसार, मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्याने महिला डॉक्टर संतापली होती. ती नेहमी चीडचीड करत असे. अशातच तिने ही धक्कादायक घटना घडवून आणली. तिने स्वत: फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलीस खोलीत आले तेव्हा सर्वत्र रक्त दिसले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. मात्र, सातत्याने लग्नासाठी टाळत असल्याने महिला संतापली होती.

दरम्यान, आरोपी महिला डॉक्टरचे नाव अभिलाषा आहे. तिचे स्थानिक वार्ड नंबर १२ येथील नगरसेवकाशी प्रेमसंबंध होते. नगरसेवक प्रकाश गुप्ताने लग्न करण्यास विरोध केल्याने तिने त्याचे गुप्तांग कापले. डॉक्टर अभिलाषाने तिच्या प्रियकराच्या प्रेमात वासनेपेक्षा काहीही नसल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत त्याला अशी शिक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही तिने सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर