शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 20:07 IST

महिला ग्राहकाच्या व्यापाला कंटाळून संबंधित विद्यार्थ्याने जीवन संपवले.

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट फार काळ लपून राहू शकत नाही. नेहमी हास्यास्पद तितक्यात संतापजनक घटना समोर येत असतात. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून अशीच एक अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एकच खळबळ माजली. एका महिला ग्राहकाने केलेली शिवीगाळ आणि अपमान सहन न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. 

संबंधित मृत तरुण बी.कॉमचे शिक्षण घेत घरखर्च भागवण्यासाठी नोकरी करायचा. ११ सप्टेंबर रोजी सामान डिलिव्हरी करण्यासाठी तो महिला ग्राहकाच्या घरी पोहोचला. पण, काही कारणास्तव त्याला घरी पोहोचण्यासाठी उशीर झाला. मग महिला ग्राहकाने पवित्रन या तरुणाशी वाद घातला आणि त्याला वाईट शब्द वापरले. याशिवाय डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून त्याची तक्रार देखील केली. मग १३ सप्टेंबर रोजी डिलिव्हरी बॉय पवित्रन याने दगडफेक करून ग्राहकाच्या घराच्या खिडकीची काच फोडली तेव्हा प्रकरण आणखी वाढले. या घटनेनंतर तक्रारदार ग्राहकाने पोलिसात तक्रार दाखल केली. मग याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली.

...अन् संपवले जीवनदरम्यान, ही घटना ताजी असताना पवित्रनने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय पवित्रनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये त्याने म्हटले की, ग्राहकाच्या व्यापाला कंटाळून मी त्रस्त झालो होतो. हेच माझ्या आत्महत्येचे कारण आहे. जोपर्यंत अशा महिला असतील तोपर्यंत असेच मृत्यू होत राहतील.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरलDeathमृत्यू