शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नवी दिल्ली : विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) च्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत निवेदन करण्यास सांगावे, असे साकडे घातले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राज्याचा दौरा करावा, अशी मागणीही त्यांनी त्यांच्याकडे केली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिष्टमंडळात कोण?खरगे यांच्याशिवाय राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, जनता दलाचे (युनायटेड) राजीव रंजन, फारूख अब्दुल्ला आणि इतर अनेक पक्षांचे नेते होते.

आम्हाला बोलू दिले जात नाही...- पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितले की, आम्ही राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आहे. तेथे घडणाऱ्या घटना विशेषत: महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. - राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही भेटलो. लोकसभेत आमचा मुद्दा मांडून कंटाळा आल्यावर अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. यावर कालच चर्चा व्हायला हवी होती. - विरोधकांना राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत चर्चा हवी आहे, पण सरकार ऐकत नाही. ‘सरकार आम्हाला सभागृहात बोलू देत नाही. माझा माइक लगेच बंद केला जातो,’ असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये रेल्वेगाडीत आरपीएफच्या जवानाने केलेला गोळीबार, हरयाणात सुरू असलेला संघर्ष, मणिपूरमधील हिंसाचार अशा घटना सध्या घडत आहेत. देशात ‘अच्छे दिन’ येणार असे केंद्र सरकारने आश्वासन दिले होते. ते हेच दिवस आहेत का? द्वेषाच्या राजकारणातून या सर्व घटना घडल्या आहेत. - कपिल सिब्बल, खासदार, राज्यसभा जनतेच्या संरक्षणाची असलेली जबाबदारी केंद्र सरकारने झटकून टाकली आहे. मणिपूरमधील घटनांकडे सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यात घटनात्मक जबाबदारीची थोडीतरी जाणीव शिल्लक असल्यास त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.    - पी. चिदंबरम, काँग्रेस नेते 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसHaryanaहरयाणा