शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:04 IST

Sudden Gamer Death: आयुष्य कधी कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाच काहीसा प्रकार अवघ्या १३ वर्षांच्या विवेकसोबत घडला आहे.

Lucknow Sudden Gamer Death: आयुष्य कधी कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाच काहीसा प्रकार अवघ्या १३ वर्षांच्या विवेकसोबत घडला आहे. शिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने  कुटुंबासोबत लखनौमध्ये आलेल्या विवेकचा १३व्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला. घरातील पलंगावर विवेक बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या बाजूला मोबाईलवर फ्री फायर गेम (Free Fire Game) सुरू होता. तातडीने विवेकला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

विवेक मूळचा सीतपूरचा होता आणि आठ दिवसांपूर्वीच तो परमेश्वर एन्क्लेव्ह कॉलनीमध्ये राहायला आला होता. आपलं शिक्षण पूर्ण करतच विवेक छोटी मोठी काम देखील करत होता. मात्र दिवसभर मेहनत करणारा विवेक रात्रीच्या वेळी ऑनलाइन गेम्सच्या आहारी जायचा. पूर्ण रात्र तो व्हिडीओ गेम्स खेळायचा. या दरम्यान तो घरात कुणाशीच बोलायचा नाही. जर, इतर कुणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो प्रचंड संतापायचा. रागाच्या भरात वस्तू फेकून द्यायचा.

'त्या' दिवशी काय घडलं?

बुधवारी विवेकला सुट्टी होती, तो घरीच होता, नेहमीप्रमाणे तो त्याच्या मोबाईल फोनमध्ये हरवला होता. त्याची मोठी बहीण अंजू घरकामात व्यस्त होती. विवेक तिला म्हणाला, "दीदी, तू तुझे काम पूर्ण कर, मी एक गेम खेळतो." यानंतर अंजू कामाला निघून गेली.  पण जेव्हा ती परत आली, तेव्हा विवेक बेडवर बेशुद्ध पडला होता, आणि त्याच्या मोबाईल स्क्रीनवर अजूनही फ्री फायर गेम चालू होता. अंजूने सुरुवातीला विचार केला की तो खेळता खेळता झोपी गेला असेल. तिने मोबाईल फोन बंद केला, तो चार्जवर ठेवला आणि विवेकच्या अंगावर ब्लँकेट टाकले. पण बराच वेळ त्याची हालचाल न दिसल्याने तिच्या मनावर शंकेची पाल चुकचुकली. तिने लगेच कुटुंबियांना फोन केला आणि त्यांनी त्याला लोहिया रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला

इंदिरा नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कुटुंबाने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. प्रत्येकालाच विवेकच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घ्यायचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teen found dead playing Free Fire; tragedy strikes Lucknow family.

Web Summary : A 13-year-old boy in Lucknow died suddenly while playing Free Fire. He was found unresponsive on his bed, phone still running the game. The cause of death is currently under investigation after he was declared dead at the hospital.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGame Addictionव्हिडिओ गेम व्यसनDeathमृत्यू