शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:53 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारमधील मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर टीका केली.

"बिहार निवडणुकीच्या नावाखाली संपूर्ण देशात एनआरसीसारखी प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे", असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला.  त्यांनी हे देशाच्या लोकशाहीसाठी "धोकादायक आणि चिंताजनक" असल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्य सरकारला निवडणूक आयोगाकडून काही कागदपत्रे मिळाली आहेत, यात असे म्हटले आहे की मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पालकांचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे.

काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

प्रत्यक्षात, निवडणूक आयोग बिहारसह सहा राज्यांमध्ये एक विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू करणार आहे. मतदार यादीतून बेकायदेशीर परदेशी नागरिकांना काढून टाकून अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे हा त्याचा उद्देश आहे. आता यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, ही प्रक्रिया बिहारमधून सुरू केली जात आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सध्या बिहारमध्ये ते लागू केले गेले आहे, पण हे स्पष्ट आहे की ते देशातील प्रत्येक राज्यात लागू केले जाईल. खरे लक्ष्य बंगाल आहे, कारण ते स्थलांतरित कामगार आणि गरीब मतदारांना घाबरतात." गरीब आणि कामगारांना त्यांच्या पालकांचे प्रमाणपत्र कुठून मिळेल?, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी या नवीन प्रक्रियेची थेट तुलना एनआरसीशी केली आणि ती त्याहूनही धोकादायक असल्याचे म्हटले. "हे लोक जाणूनबुजून गरीब आणि तरुण मतदारांचे हक्क हिरावून घेऊ इच्छितात. तरुण पिढीला मतदानाचा अधिकार नाही का?, असा आरोपही त्यांनी केला.

'निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेत आहे, असा आरोप सीएम ममता बॅनर्जी यांनी केला. त्या म्हणाल्या, "ECI ला वाटते की राजकीय पक्ष आणि निवडून आलेली सरकारे त्यांचे गुलाम आहेत. ही मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते." निवडणूक आयोगाने TMC कडून बूथ लेव्हल एजंट्सची माहिती मागितली आहे, जी पक्षाने देण्यास नकार दिला आहे, असंही त्यांनी सांगितले.ही सर्व भाजप प्रचारकांनी बनवलेली योजना आहे. मी त्याचा तीव्र विरोध करेन, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Mamata Banerjeeममता बॅनर्जी