शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध! पत्नी वैतागली अन् उद्योगपती पतीला ९ वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 17:12 IST

छत्तीसगडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे.

छत्तीसगडमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एका व्यावसायिकाला नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यावसायिकावर पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप होता आणि तो सिद्ध झाल्यामुळे आरोपी उद्योगपतीला नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दुर्गच्या फास्ट ट्रॅक्ट कोर्टात हा खटला सुरू होता. संबंधित व्यापारी हा भिलाई-दुर्ग शहरातील आहे. २००७ मध्ये त्याचे लग्न झाले. पण, लगेचच जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंधांसह मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप व्यावसायिकाच्या पत्नीने केला.

न्यायालयाने सुनावली शिक्षा अनैतिक शारिरीक संबंधांसह उद्योगपतीच्या पत्नीने विविध आरोप केले आहेत. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप व्यावसायिकाच्या पत्नीने केला आहे. या सगळ्यामुळे त्रासून तिने सासरचे घर सोडले आणि एकटी राहून तिने आपल्या मुलीचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये ती तिच्या मुलीसह माहेरच्या घरी परतली. पीडित महिलेने ७ मे २०१६ रोजी सुपेला पोलील ठाण्यात पती आणि त्याच्या घरच्यांविरूद्ध आयपीसी कलम ३७७ अन्वये अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि कलम ४९८ए अंतर्गत हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

जबरदस्ती करणं भोवलं पीडित महिलेने केलेले आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने तिच्या पतीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने आदेशात म्हटले, "गुन्ह्याचे स्वरूप पाहता आरोपीवर कारवाई होईल. आरोपीचा गुन्हा आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत येतो, जो दंडनीय गुन्हा आहे. कलम IPC च्या ३२३ अंतर्गत (जाणूनबुजून त्रास देणे) एक वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड देखील आयपीसी अंतर्गत ठोठावण्यात आला आहे." 

पीडित महिलेच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये लग्न झाल्यानंतर पीडितेला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर या सगळ्यासोबतच तिला जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध देखील ठेवावे लागले. शारीरिक व मानसिक छळासोबतच हुंड्यासाठी देखील तिचा छळ केला जात होता. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नsexual harassmentलैंगिक छळ