शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या जवळचे नोकरशहा उत्तर प्रदेशात बनणार मंत्री; योगी आज पंतप्रधानांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:33 IST

१५, १६ किंवा २१ मार्च रोजी योगी सरकारचा शपथविधी होऊ शकतो. 

- राजेंद्र कुमारलखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विचारविनिमय पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये बेबी राणी मौर्य, पंकज सिंह, राजेश्वर सिंह, असीम अरुण व अरविंद कुमार शर्मा यांच्यासह दोन सहयोगी पक्षांच्या चार जणांना मंत्री केले जाणार आहे. 

रविवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व यूपीचे प्रभारी अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. दलित समाजाचा सहभाग वाढविणे व जातीय तसेच प्रादेशिक संतुलन ठेवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार ते आग्रा ग्रामीणच्या आमदार बेबीराणी मौर्य यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त आयएएस व एमएलसी अरविंद कुमार शर्मा, सेवानिवृत्त आयपीएस असीम अरुण व अंमलबजावणी संचालनालयाचे माजी संयुक्त संचालक आ. राजेश्वर सिंह यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत ते आग्रही आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह  आहेत. यानाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. 

शपथविधीसाठी तीन तारखा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, योगींच्या शपथविधी समारंभात पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १५, १६ किंवा २१ मार्च रोजी योगी सरकारचा शपथविधी होऊ शकतो. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी