शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंका करणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर; देशभरात तीव्र संताप, रात्री उशिरा अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 08:45 IST

प्रवेशचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. तो १० दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिधी (मध्य प्रदेश) : मद्यधुंद  अवस्थेत  एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केलेला भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्यावर एनएसए लावण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. या प्रकरणामुळे भाजपवर देशभरातील विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले आहे.

प्रवेशचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. तो १० दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हा सिधी जिल्ह्यातील भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचा प्रतिनिधी आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा यांनी या घटनेबाबत आदिवासी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रामलाल रौतेल यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल भाजप प्रदेशाध्यक्षांना सादर करणार आहे.

फाशी देण्याची मागणी लघुशंका केल्याच्या घटनेवरून बुधवारी इंदूरमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दलित आणि आदिवासींनी निदर्शने केली. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करणारे फलक हातात घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. फेडरेशनचे अध्यक्ष मनोज परमार यांनी म्हटले की, आदिवासी तरुणावर लघुशंका करून संपूर्ण देशाला लाज आणली आहे. शुक्ला याला फाशी द्यावी.

संबंधितावर एनएसए तसेच बुलडोझरही चालवला आहे. गरज पडली तर गुन्हेगारांना १० फूट जमिनीखालीही गाडले जाईल. - शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत. या अमानवी कृत्याने संपूर्ण मानवतेला लाज वाटली आहे. भाजपच्या द्वेषाचा हा घृणास्पद चेहरा समोर आला आहे.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस