शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 13:04 IST

Police demands 5 kg potatoes as bribe : पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

Police demands 5 kg potatoes as bribe : लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्‍नौज जिल्ह्यात लाच मागण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी आणि तक्रारदार यांच्यात एका कामासाठी बटाट्यांची लाच देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कन्नौज जिल्ह्यातील सौरिख पोलीस ठाणे क्षेत्रातील चपुन्ना पोलीस ठाण्याचे प्रभारी रामकृपाल सिंह आणि तक्रारदारांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यात लाच म्हणून बटाटे मागण्यात आले होते. संबंधित ऑडियो क्लिपमध्ये पोलीस ठाण्याच्या प्रभारीने प्रकरण मिटवण्यासाठी लाचेच्या रुपात ५ किलो बटाटे मागितले. मात्र, समोरचा व्यक्ती बटाटे देण्यास असमर्थता दाखवत आहे. त्याने केवळ २ किलो बटाटे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, शेवटी दोघांचे ३ किलो बटाट्यांवर एकमत झाले.  

हा ऑडियो व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारीला निलंबित करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हायरल ऑडियोची पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी दखल घेतली आहे. त्यांनी चौकी प्रभारीला तत्काळ निलंबित केले. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बटाटे शब्दाचा वापर केवळ भ्रष्टाचाराचा कोड रुपात केला आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे व आरोपी पोलीस निरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी केली जात आहे.

आलू कहे आज का, नहीं चाहिए भाजपा - अखिलेश यादवदुसरीकडे, याप्रकरणावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  ते म्हणाले की, "भाजपच्या राजवटीत 'बटाटा' हा लाच घेण्यासाठी कोड वर्ड बनला आहे. तसं, भाजपच्या राजवटीत भाजीपाला एवढा महागला आहे की, उद्या प्रत्यक्षात भाजीच्या स्वरूपात लाच मागितली जाईल. आता भाजप विचार करत आहे की, आपल्या इन्स्पेक्टरला वाचवण्यासाठी बटाट्यांवर बुलडोझर का चालवू नये. आलू कहे आज का, नहीं चाहिए भाजपा."

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसPotatoबटाटा