शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:34 IST

गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत.

मुजफ्फरपूर - जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीतील मोहनपूर भाग सध्या चर्चेत आहे. हा परिसर  भूमिहार आणि वैश्य समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. येथे सुमारे ५०० हिंदू कुटुंबे राहतात आणि एकही मुस्लिम कुटुंब नाही असं गावातील लोक सांगतात. परंतु अलीकडेच जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीत विशेष सुधारणा (SIR) केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली तेव्हा गावकरी आश्चर्य चकित झाले.

गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत. आरोग्य विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी कामेश्वर ठाकूर यांच्या कुटुंबात ६ सदस्य मतदार आहेत. परंतु यादीत त्यांच्या कुटुंबात आणखी २ मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. त्याचप्रकारे मैथुर ठाकूर, दिलीप ठाकूर कुटुंबात ५ मतदार होते, त्यांच्या घरात आणखी ४ मुस्लीम मतदारांच्या नावांचा समावेश केला आहे. ही सामान्य चूक नाही तर मोठे षडयंत्र आहे असा आरोप कामेश्वर ठाकूर यांनी करत आमच्या कुटुंबात मुस्लीम नावे कशी जोडली हे न कळण्यासारखे आहे असं त्यांनी म्हटलं. 

गावात मोठा कांड झाला...

गावात अन्य कुटुंबासोबतही हाच प्रकार घडला आहे. अनेक वर्ष गावात जी घरे बंद आहेत, ज्यांचे मालक गाव सोडून बाहेर राहायला गेलेत. त्यांच्या घरातही मुस्लीम मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे गावातील जमीन, वारसा आणि संपत्ती यांच्यावरही वाद निर्माण होऊ शकतो असा आरोप गावकऱ्यांनी केला. 

बंद घराशी कशी जोडली नावे?

उमेश ठाकूर जे बँकेत नोकरी करतात. त्यामुळे त्यांचे गावाकडचे घर कायम बंद असते. परंतु त्यांच्या कुटुंबाच्या मतदार यादीत ८ मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मुन्द्रिका ठाकूर यांचे घरही वर्षोनुवर्ष बंद आहे. त्यांच्या घराभोवती झाडीझुडपे उगवली आहेत. तरीही मतदार यादीत मृत मुन्द्रिका यांच्यासह ८ मुस्लीम नावे दाखवण्यात आली आहेत. आमच्या परिसरात एकही मुस्लीम राहत नाही. तरीही प्रत्येक घरातील मतदार यादीत मुस्लीम नावे कशी जोडली असा प्रश्न गावकरी कृष्ण कुमार यांनी विचारला आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

गावकऱ्यांनी प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी गावचा दौरा केला परंतु अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही नाही. जर मतदार यादीतील नावे काढली नाहीत, योग्य सुधारणा केली नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. मोहनपूरा परिसर यासाठीही संवेदनशील आहे कारण २०२० च्या विधानसभा निवडणुकीत साक्रा मतदारसंघात तगडी लढत झाली होती. जेडीयू उमेदवार अशोक चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १५३७ मतांनी पराभव केला होता. त्यात अशाप्रकारे मतदार यादीतील घोळ समोर आल्याने निवडणुकीच्या निकालांवर काही बदल करायचा आहे का असा संशयही गावकऱ्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगHinduहिंदूMuslimमुस्लीम