मध्य प्रदेशातील पन्ना परिसर आधीपासून हिऱ्यांच्या उत्पादनाने प्रसिद्ध आहे. आता आणखी एक परिसर यासाठी प्रसिद्ध होणार आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-शिवपुरी परिसरात मोठी खाण सापडल्याचे बोलले जात आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) ने केलेल्या सर्वेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत. चंबळ प्रदेशातील संपूर्ण ४२१ किलोमीटर परिसरातील दऱ्याखोऱ्या आणि जंगलांमध्ये हिरे आढळू शकतात, असं या सर्वेक्षणात म्हटले आहे.
पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
सरकारी संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, पन्ना हिरे ज्या भागात आढळतात तो विंध्याचल टेकड्यांचा परिसर आहे आणि चंबळ देखील याच भागात येतो. GSI ने सांगितले की, या भागातील माती, खडक आणि हवामान पन्नासारखेच आहे, त्यामुळे येथे हिरे सापडण्याची पूर्ण शक्यता आहे. जीएसआययने त्यांच्या सर्वेक्षणात चंबळ परिसरातील ३५ गावे डायमंड ब्लॉकसाठी ओळखली आहेत.
जीएसआयने या संपूर्ण परिसराला नरवार डायमंड ब्लॉक असे नाव दिले आहे. एकेकाळी दरोडेखोर आणि बंडखोरांच्या गोळ्यांनी ओळखल्या जाणाऱ्या परिसराला आता हिऱ्यांमुळे नवी ओळख मिळणार आहे.
खाणींचे वाटप केले जाणार
मध्य प्रदेशातील पन्ना प्रदेशात हिरा आढळतो. ते विंध्य समूहाचा एक भाग आहे. ग्वाल्हेर देखील विंध्य समूहाच्या अंतर्गत येतो. जीएसआयला त्यांच्या उपग्रह सर्वेक्षणात ग्वाल्हेर परिसरात हिरे असल्याचे संकेत मिळाले आहेत. यासाठी चिनौर आणि मोहना परिसर निवडण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाची जमीन या भागात येते. आता हिऱ्यांच्या खाणीसाठी जागा ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण आता दुसरे सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहेत. ग्वाल्हेरच्या घाटीगाव ब्लॉक आणि भितरवार ब्लॉकमधील हिऱ्यांच्या खाणींसाठी हे सर्वेक्षण केले जाईल. जीएसआयने महसूल, वन आणि राखीव वनजमिनीची माहिती मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, हिऱ्यांच्या खाणींसाठी खाणींचे वाटप केले जाणार आहे.
या ३५ गावांमध्ये खाणकाम होणार
जिल्हा खनिज अधिकारी प्रदीप भुरिया यांनी दिलेली माहिती अशी, सध्या ग्वाल्हेरमध्ये हिऱ्यांच्या उत्खननासाठी ३५ गावे ओळखली आहेत.
घाटीगाव ब्लॉकमधील करई, दुर्गासी, बनहेरी, सेकरा, चुही, बरहाना, पतप्री, उम्मेदगड, ओब्रा, पटाई, मानपुरा, कलवाह, सेमरी, चांगोरा, डागोर, तघाई, बडकागाव, मोहना इत्यादी गावांमध्ये जीएसआयने ब्लॉक्सची मागणी केली आहे. ... मध्ये खाणकाम केले जाईल. त्याच वेळी, भितरवार ब्लॉकमध्ये, भितर, गढोटा, मावठा, हरसी, खोर, मुसहरी, सेबाई, जटारभी, रिचारी खुर्द, जाखवार, बेलगडा, डुंगरपूर, मुधारी, रुआर, तालपूर विरण, बामोर, रिचारी कला, हुरहुरी, रिठोदन , गजना, श्याउ, चितोली , देवरी कला, कॅथोड, धोबत, लोधी, करहिया आणि बैना गावांमध्ये खाणकाम केले जाणार आहे.