शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! प्रियकराला मिळवण्यासाठी तरूणीची 'काळी जादू', ८.२० लाख गमावले; FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:53 IST

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

प्रेम आंधळं असतं, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचा प्रत्यय देणारी अनेक उदाहरणं समाजात आहेत. प्रेमात ब्रेकअप झाल्यावर तर त्या धक्क्यातून सावरणं म्हणजे अनेकांसाठी कठीण काम असते. किंबहुना अनेकांना यातून सावरता न आल्यानं ते धाडसी निर्णय घेतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. प्रियकर सोडून गेल्यानंतर उद्विग्न झालेल्या तरूणीनं त्याला मिळवण्यासाठी काळी जादू केली पण तब्बल ८.२० लाख रूपये गमावले.  

बंगळुरूतील जलाहल्ली येथील २५ वर्षीय राहिला (बदलेलं नाव) या तरूणीला तिच्या पहिल्या प्रियकराला मिळवायचं होतं. या निराशेत तिने एक भन्नाट मार्ग आजमावला पण तिला ८.२० लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले. माहितीनुसार, प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राहिलाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिची ओळख सोशल मीडियाद्वारे अहमद नावाच्या एका 'बाबा'शी झाली. 

राहिलाने ९ डिसेंबर रोजी अहमद या बाबाशी ऑनलाइन संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की, तुझा पहिला प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी तुझ्यावर काळी जादू केली आहे. ज्यामुळे तुला तुझ्या आयुष्यात समस्या येत आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी बाबाने काही युक्त्या सांगितल्या, त्यासाठी त्याने ५०१ रुपयांची मागणी केली.

प्रियकरावर काळी जादू करण्यासाठी २.४ लाख मागितलेबाबाने युक्ती सांगताच राहिलाने त्याला प्रथम ५०१ रूपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, त्यानंतर अहमदने राहिलाला तिचे, तिच्या प्रियकराचे आणि कुटुंबाचे फोटो मागवले. संबंधित बाबा म्हणजेच अहमदने राहिलाला सांगितले की, जर तिने २.४ लाख रुपये दिले तर तो तिच्या पहिल्या प्रियकरावर आणि त्याच्या कुटुंबावर काळी जादू करू शकतो. या जादूनंतर कोणीही तुमच्या नात्याच्या विरोधात जाणार नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, पीडित राहिला अहमदच्या शब्दांना एवढी बळी पडली की, तिने २२ डिसेंबर रोजी कर्ज काढून त्याला २.४ लाख रुपये दिले. मग काही दिवसांनी अहमदने तिच्याकडे आणखी १.७ लाख रुपयांची मागणी केली. सातत्याने पैशांची मागणी केल्याने राहिलाला संशय आला आणि तिने अहमदला पैसे देण्यास नकार दिला.

फोटो शेअर करण्याची दिली धमकी राहिलाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अहमदने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. कारण अहमदने गोड बोलून राहिलाकडून तिच्या पहिल्या प्रियकरासोबतचे फोटो घेतले होते. अहमदच्या या धमकीला बळी पडत राहिलाने ४.१ लाख रूपये दिले. फसवणूक झाल्याची माहिती राहिलाने पालकांना दिली. यानंतर घरच्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर राहिलाने जलाहल्ली पोलीस स्थानकात जाऊन एफआयआर दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अहमदने हे सर्व पैसे त्याचा सहकारी लियाखतुल्लाहच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. अहमदने सांगितले की, राहिलाने त्याला काळी जादू करण्यास भाग पाडले आणि तो लवकरच तिचे पैसे परत करणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सध्या अहमदचा फोन बंद आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी