शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:56 IST

अचानक घडलेला हा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

सूरत - काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता, घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्यातच गुजरातमध्ये एका कुटुंबाच्या या आनंदावर विरजण पडले आहे. गुजरातच्या सूरतमध्ये घडलेल्या या घटनेने अनेकांना व्यथित केले आहे. याठिकाणी ऋषभ गांधी नावाच्या २७ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ऋषभ त्याच्या टेक्सटाइलच्या दुकानात नेहमीप्रमाणे काम करत बसला होता. त्याचवेळी अचानक त्याला हार्ट अटॅक आला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ऋषभ मूळचा जोधरूरच्या चांदपोल भागात राहणारा होता. माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ऋषभ दुकानावर त्याचे दाजी आणि मित्र यांच्यासोबत बोलत बसला होता. त्यावेळी ऋषभला तहान लागली तेव्हा समोरील पाण्याच्या बॉटलचं झाकण उघडून त्याने पाणी पिण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या हातापायाने काम करणे बंद केले आणि बसल्या जागीच तो खाली कोसळला. अचानक घडलेला हा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ऋषभची अवस्था पाहून त्याच्या दाजी आणि मित्रांनी त्याला सीपीआर देणे सुरू केले. परंतु ऋषभने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर खुर्चीवरच बसवून त्याला पार्किंगपर्यंत आणले गेले. या गोंधळात ऋषभला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऋषभ गांधी याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचे सांगितले गेले. या घटनेने ऋषभच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ऋषभचं अंत्यसंस्कार त्याच्या राजस्थानच्या मूळ गावी करण्यात येणार आहे. मृत ऋषभ बहिणीसोबत इथे गुजरातला राहत होता तर त्याचे आई वडील गावात राहायचे. गुजरातमध्ये त्याने मित्र आणि नातेवाईकांसोबत मिळून टेक्सटाईल मार्केटमध्ये कपड्याचे दुकान सुरू केले होते.

हार्ट अटॅक येण्याआधीच ओळखा धोका

भारतात हृदयरोगांचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, हायपरटेंशन इत्यादींचा समावेश आहे. स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या स्थिती हार्ट ब्लॉकेजचा धोका अधिक वाढवतात. तेच हार्ट ब्लॉकेजच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, कमजोरी आणि थंडी लागणे इत्यादींचा समावेश आहे. नॉर्मल हार्ट रेट एका मिनिटात 60 ते 100 असतं. जर यात बदल होत असेल तर याचा हार्ट हेल्थवर वाईट प्रभाव पडू शकतो. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका