शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 14:01 IST

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मंदिर प्राधिकरणाने यासंदर्भात माहिती दिली असून जीन्स पॅंट अथवा शॉर्ट कपडे घातल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले आहे. शिमल्यातील हे जैन मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे आणि लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. श्री दिगंबर जैन सभा या मंदिराची देखभाल करते. मंदिर प्रशासनाने अलीकडेच नवीन ड्रेस कोडची रूपरेषा देणारी नोटीस मंदिराबाहेर लावली आहे.

मंदिर प्रशासनाने लावलेल्या बोर्डमध्ये म्हटले, "सर्व महिला आणि पुरुषांनी पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालून मंदिरात यावे. शॉर्ट कपडे, हाफ पॅन्ट, बर्मुडा, मिनी स्कर्ट, फाटलेल्या जीन्स, फ्रॉक आणि थ्री क्वार्टर जीन्स इत्यादी परिधान केलेल्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे." 

शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्रीया प्रकरणावर जैन मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, महिलांची बदलत चाललेली फॅशन आणि पेहरावाची पसंती तसेच हिंदू संस्कृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर धर्माचे अनुसरण करणारे लोक त्यांच्या मूळ धार्मिक श्रद्धा आणि प्रथा कधीही सोडत नाहीत परंतु हिंदू आणि सनातन धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक मूल्यांशी तडजोड करत आहेत. आम्ही नवीन ड्रेस कोडची रूपरेषा देणारा फलक लावला आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या लोकांनी अनुसरण करण्यास सुरुवात केली आहे.

मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर एका भक्ताने सांगितले की, हे १०० वर्षे जुने मंदिर आहे. हा निर्णय म्हणजे आपल्या संस्कृतीचे पालन करणे होय. छोट्या कपड्यांमध्ये मंदिरांना भेट देणारे या प्रार्थनास्थळांशी संबंधित रूढी आणि परंपरांचे उल्लंघन करत आहेत. तर आणखी एक भक्त हर्ष जैन म्हणाले की, जेव्हा मंदिरांचा विचार केला जातो तेव्हा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारत आहोत आणि आपल्याला आपलाच विसर पडत चालला आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशJain Templeजैन मंदीरHinduहिंदू