शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 9:25 AM

यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाच राज्यांमधील 17 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे 993 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाऊस आणि महापुरामुळे 22 ऑगस्टपर्यंत देशात 993 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये केरळमधील सर्वाधिक 400 जणांचा समावेश  आहे.  गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2018मध्ये पूरस्थितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना फटका बसला आहे. त्यापैकी सुमारे 17 लाख लोक विस्थापित झाले . या अहवालानुसार केरळबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटकच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक नुकसान केरळमध्ये झाले आहे. केरळमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा वाढून 400 च्या पुढे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळबरोबरच मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 204, पश्चिम बंगालमध्ये 195, कर्नाटकमध्ये 161 आणि आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 54 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी 14 लाख 52 हजार लोकांना मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच आसाममध्ये 11 लाख 46 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच सुमारे 2 लाख 45 हजार जणांना मदत केंद्रात पाठवण्यात आले आहे. याआधी 2017 मध्ये पाऊस आणि पुरामुळे 1200 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2016 साली पुरामुळे बिहारमध्ये 254 तर मध्य प्रदेशात 184 जणांचा मृत्यू झाला होता. पाऊस आणि पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक विशेष निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना अद्याप तयार करू शकलेले नाही.  प्राप्त माहितीनुसार देशातील प्रत्येक राज्याकडे पूर आणि पावसाच्या संकटापासून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस