शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या अन् मोदी विश्व गुरू व्हायला चाललेत; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 15:12 IST

एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे.

एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून बाहेर आली तर मोदींमुळे २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत ढकलली गेली. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचं उत्पन्न वाढवणारं नव्हे, तर उत्पन्न घालवणारं सरकार आहे, असा आरोप खरगे यांनी यावेळी केला. 

पेट्रोलनं गाठली शंभरीदेशात आज अनेक ठिकाणी पेट्रोल १०० रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. देशात आज महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल विकलं जातंय. मुंबईसारख्या शहरात आज पेट्रोल प्रतिलीटर १०८ रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्र सरकार इंधनाच्या किमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही. तो थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहे. पेट्रोलवर कर लादून केंद्रानं २५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. पण त्यातील कोणताही महसूल राज्याला दिलेला नाही, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

मोदींनी ५ वर्ष मागितली होती त्याचं काय झालं?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी काँग्रेसला ७० वर्ष दिली. मला ५ वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करुन दाखवतो असं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल खरगे यांनी यावेळी उपस्थित केला. देशाच्या इतिहासात आज सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल विकलं जात आहे. तर सिलिंडरच्या दरातही वाढ झालीय. सिलिंडरवर मिळणारं अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून कुणालाही मिळालेलं नाही, असंही खरगे म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या