शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

2.89 लाख कोटी रुपये जमा करणारे ते 9.72 लाख ठेवीदार रिझर्व्ह बँकेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:07 IST

नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.

ठळक मुद्देचलनात असलेल्या 99 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेअवघे 8000 कोटी रुपये परत आले नसल्याचे सांगण्यात आले.नोटाबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाली असून 56 लाख नवीन करदाते यंत्रणेशी जोडले गेले आहेत.

नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.काल बुधवारी रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारताच्या मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी केलेल्या ऐतिहासिक नोटाबंदीनंतर 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर चलनात असलेल्या  99 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणि अवघे 8000 कोटी रुपये परत आले नसल्याचे सांगण्यात आले.जवळपास 15 लाख कोटी रुपयांचे चलन परत आल्यानंतर यामध्ये काळ्या पैशाचे प्रमाण लक्षणीय असल्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. अर्थव्यवस्थेतील रोख रक्कमांचे व्यवहार कमी करावे हा नोटाबंदीचा उद्देश होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. आता, प्रत्येक पैशाला कुणी ना कुणी मालक असल्याचेही ते म्हणाले.गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले की, बँकेमध्ये पैसे जमा झाले याचा अर्थ असा नाही, की हे सगळे पैसे कायदेशीर आहेत. नोटाबंदीमुळे तीन लाख नकली कंपन्या उघड झाल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच नोटाबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाली असून 56 लाख नवीन करदाते यंत्रणेशी जोडले गेले आहेत.

काँग्रेसचा सरकारवर तुफानी हल्ला

रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७00 दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये आहे.या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. १ टक्का रकमेसाठी नोटाबंदी लागू करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांनी म्हटले की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या स्वरूपात १५,४४,000 कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी फक्त १६,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळालेले नाहीत. याचा अर्थ नोटाबंदीतून रिझर्व्ह बँकेला काळ्या पैशाच्या स्वरूपात १६,000 कोटी रुपयांचा लाभ झाला. त्याच वेळी नव्या नोटा छापण्यासाठी २१,000 कोटी रुपये खर्च झाले. ९९ टक्के नोटा कायदेशीररीत्या परत मिळाल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी