शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

घर खरेदीसाठी लवकरच काढता येणार 90 टक्के पीएफ

By admin | Updated: March 15, 2017 18:39 IST

केंद्र सरकार 4 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना घर खरेदीसाठी 90 टक्के भविष्य निर्वाह निधी काढण्याची सवलत देण्याच्या विचारात आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - केंद्र सरकार 4 कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना घर खरेदीसाठी 90 टक्के भविष्य निर्वाह निधी काढण्याची सवलत देण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारनं आज याची संसदेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या तरतुदीमुळे ईपीएफ सदस्यांना घर खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट भरण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत दुरुस्ती केल्यानंतर नोकरदात्यांना स्वतःच्या ईपीएफ अकाऊंटवरून होम लोन आणि ईएमआयही भरता येणार आहे. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार 10 ईपीएफओ सदस्यांना एकत्र येऊन एका को ऑ. सोसायटीची स्थापना करावी लागणार आहे. त्यानंतरच ही रक्कम त्यांना काढता येणार आहे. नोकरदारांच्या घरांसंबंधी प्रश्नाला उत्तर देताना बंडारू दत्तात्रय संसदेत म्हणाले, सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 1952च्या कायद्यात संशोधन सुरू आहे. या योजनेत परिच्छेद 68 डी जोडण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार सदस्य कोणत्याही को. ऑ. सोसायटी किंवा हाऊसिंग सोसायटीचा सदस्य असल्यास त्याला घर अथवा प्लॅट खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खात्यामधून 90 टक्के रक्कम काढता येणार आहे. तसेत दुकान बनवण्यासाठीही तुम्हाला ही रक्कम वापरता येणार आहे, असंही दत्तात्रय म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी पीएफ खातेधारकांना अशी सुविधा देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. बहुतेक कर्मचारी स्वतःचं आयुष्य भाड्याच्या दुकानात घालवतात. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम ते घर खरेदी करण्यासाठी वापरतात. सध्या तरी ईपीएफओच्या अंतर्गत येणा-या सर्व कर्मचा-यांना स्वतःच्या पगाराची 12 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी द्यावी लागते. त्यात मूळ वेतन आणि महागाईभत्त्याचाही समावेश असतो.