शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

9 Year Old Gang Raped : सावत्र आईनंच रचला 9 वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार-हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:45 IST

Jammu Kashmir Rape Case: माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे.

श्रीनगर - आई ही मुलीची सर्वात जवळची मैत्रीण असते, असे म्हटले जाते. मात्र याच माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. सावत्र आईनंच 9 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणण्याचा व नंतर तिची निर्घृण हत्या करण्याचा कट रचल्याची हादरवणारी आणि तितकीच चीड आणणारी माहिती समोर आली आहे. या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

ऑगस्ट महिन्यामध्ये उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात नऊ वर्षांच्या मुलीचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या सावत्र भावासह तीन जणांचा या गुन्ह्यामध्ये समावेश होता. मुलीची हत्या केल्यानंतर चाकूनं तिचे डोळे बाहेर काढण्यात आले आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या शरीरावर अॅसिड ओतून मृतदेह जंगलामध्ये फेकण्यात आला. 

पोलीस अधीक्षक इम्तियाज हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली होती आणि 2 सप्टेंबरला तिचा मृतदेह छिन्हविछिन्ह अवस्थेत जंगलात आढळून आला होता. याप्रकरणी सावत्र आईसहीत तिचा मुलगा आणि  त्यांच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या. यातील एक जण मूळची झारखंडची आहे तर दुसरी काश्मीरमधीलच आहे. ज्या मुलीची हत्या करण्यात आली, ती झारखंडमधील पत्नीची मुलगी होती.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं सांगितले की, पती दुसऱ्या पत्नीसोबत अधिक वेळ घालवायचा आणि आपल्या सर्व मुलांमध्ये याच मुलीचे सर्वात जास्त लाड व्हायचे. यामुळे कौटुंबिक तणाव वाढत होता. पतीच्या दुसऱ्या पत्नीबाबत असलेल्या द्वेष भावनेतूनच आरोपी महिला सावत्र मुलीला जंगलात घेऊन गेली.  यावेळेस तिनं स्वतःसोबत चाकूही घेतला होता. याच चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनास्थळाहून चाकू आणि कुऱ्हाड ताब्यात घेण्यात आली आहे.  

  

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारCrime Newsगुन्हेगारीJammu Kashmirजम्मू-काश्मीर