शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या देशभर ९१ प्रचारसभा; योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:41 IST

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना सर्वाधिक मागणी होती त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सगळ्यत मोठे स्टार प्रचारक ठरले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना सर्वाधिक मागणी होती त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सगळ्यत मोठे स्टार प्रचारक ठरले. दुसऱ्या स्थानी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसºया क्रमांकावर होते.भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी येथे ही माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी देशभर जवळपास १,३०० प्रचारसभा घेतल्या. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव असलेल्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा आम्ही आयोजित केल्या. त्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल.योगी आदित्यनाथ यांनी देशभरात १३५ सभा घेतल्या, तर जयराम ठाकूर यांनी १०६ आणि फडणवीस यांनी ९१. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी देशात ८६ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ५८ सभा घेतल्या.आदित्यनाथ यांना त्यांच्या जोशपूर्ण व धार्मिक भाषणांमुळे, तर फडणवीस यांना विकासाच्या मुद्यावर मागणी होती. फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राज्यात विकास योजनांना गती दिली, सिंचन योजनांचा विस्तार केला व राज्यात केंद्राच्या योजनांना विक्रमी वेळेत मंजुरी दिली त्यावरून ते विकासाबाबत विजय रुपानी यांच्याही पुढे निघून जाताना दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांची भाषणे ऐकली व ते प्रभावित झाले. त्यांच्या प्रचाराचा आम्हाला लाभ होईल, अशी आशा आहे, असे शहा म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा