शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 07:34 IST

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे.

जोधपूर- 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. सलमानच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या रातोरात बदली झाली आहे. राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून याअंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. यामध्ये सलमान खानच्या जामिनावर सुनावणी करणारे आणि शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. एकाच वेळी 87 न्यायाधीशांची बदली झाल्याने सलमानच्या जामीन अर्जावरील सुनावणी रखण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. काळवीटाची शिकार केल्या प्रकरणी दोषी ठरविलेल्या सलमान खानला कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार होती पण कोर्टाने सुनावणी न करता निर्णय राखून ठेवला. त्यामुळे सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगात काढावी लागली. आता न्यायाधीशांची बदली झाल्याने सलमानसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

 बिष्णोई समाजाच्या वकिलांच्या मते, राजस्थानमधील न्यायाधीशांची बदली होणं ही नियमित प्रक्रिया आहे. कारण बऱ्याच न्यायाधीशांची बदली ही एप्रिल महिन्यातच होत असते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर के जोशी यांचीही बदली करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात नेहमी न्यायाधीशांची बदली होते. पण आता एकाचवेळी झालेल्या बदलीमुळे सलमानच्या जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारची रात्रही सलमानला तुरूंगात घालावी लागू शकते. न्यायाधीशांच्या बदलीमुळे सलमानच्या पूर्ण प्रकरणावर नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी होईल. त्यामुळे सलमानला आणखी काही काळ तुरूंगातच राहावे लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Blackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणSalman Khanसलमान खानJodhpur courtजोधपूर न्यायालय