शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: ताैक्तेचे ८६ बळी; ओएनजीसीचे तीन कार्यकारी संचालक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:06 IST

ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू ठेवल्यामुळे बॉम्बे हायमध्ये असंख्य लोक अडकून पडले होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने ६२८ जणांची सुटका केली होती.

मुंबई : अरबी समुद्रात आलेल्या ताैक्ते चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळील समुद्रातील तेल क्षेत्र ‘बॉम्बे हाय’मधील घटनाक्रमाची चौकशी सुरू असून त्याअंतर्गत तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) तीन कार्यकारी संचालकांना निलंबित करण्यात आले आहे. बॉम्बे हायमधील ८६ कामगारांचा चक्रीवादळात बळी गेला असून अधिकाऱ्यांनी वादळाच्या पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू ठेवल्यामुळे बॉम्बे हायमध्ये असंख्य लोक अडकून पडले होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने ६२८ जणांची सुटका केली होती.निलंबित करण्यात आलेले तीन वरिष्ठ अधिकारी अनुक्रमे ड्रिलिंग, सुरक्षा आणि शोध मोहीम विभागांचे प्रमुख आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नियुक्त केलेली समिती या घटनेची चौकशी करीत आहे. बॉम्बे हायच्या इतिहासातील  चक्रीवादळामुळे घडलेली ही सर्वांत मोठी दुर्घटना ठरली आहे. सूत्रांनी सांगितले की, स्टॉर्म जिओ या खाजगी संस्थेने वादळ निकट आल्याचा इशारा दिला होता. वादळामुळे समुद्राची पातळी ७ ते ९ मीटरने वाढणार असल्याचेही इशाऱ्यात म्हटले होते. याची माहिती पी३०५ डेक अधिकाऱ्याने वरिष्ठांना कळवून पुढील आदेश मागितले होते. तथापि, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून अनेकांचा जीव धोक्यात घातला, असे पुरावे चौकशी समितीसमोर आले आहेत.दरम्यान, तेल क्षेत्रातील अधिकाऱ्यांची संघटना ‘असोसिएशन ऑफ सायन्टिफिक अँड टेक्निकल ऑफिर्स’ने (आस्टो) निलंबनाच्या कारवाईस आक्षेप घेतला आहे. या दुर्घटनेस कंत्राटदार कंपनी मे. ॲफकॉन्स जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.