शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

८२ वर्षाचा वर अन् वधू ३६ वर्षाची! निवृत्त अधिकाऱ्याने धरला निराधाराचा हात, अनोखा विवाह पाहण्यासाठी कोर्टात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 20:22 IST

Marriage Ceremony : पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती.

उज्जैन : वृद्धापकाळात एकाकी जीवन जगणाऱ्या ८२ वर्षीय वृद्धाने शुक्रवारी एडीएम कोर्टात ३७ वर्षीय विधवा महिलेशी लग्न केले. हा वृद्ध १९९९ मध्ये पीडब्ल्यूडी विभागातून निवृत्त झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहत होता. पतीच्या निधनानंतर ही महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत होती. या दोघांनी भेटीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.वधू आणि वर कोण आहे?एसपी जोशी असे या वराचे नाव असून, ते उज्जैनमधील वल्लभनगर येथील रहिवासी आहेत. ते पीडब्ल्यूडीमध्ये विभागप्रमुख होते. फेब्रुवारी १९९९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पत्नी आणि मुले नसल्याने एकटे राहत होते. त्याचवेळी वधू विभा जोशी या शास्त्रीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वय 36 वर्षे आहे. ती गृहिणी असून पतीच्या निधनानंतर आपल्या ६ वर्षाच्या मुलासह एकटीच राहत होती.संमतीने विवाहदोघांचे लग्न झाल्याची माहिती मिळताच हा अनोखा लग्नसोहळा पाहण्यासाठी आणि फोटो व्हिडिओ बनवण्यासाठी कोर्ट परिसरात तोबा गर्दी झाली होती. गर्दी आणि मीडिया पाहून दोघेही संतापले. वराने सांगितले की, आम्हाला करमणुकीचे साधन समजू नका, आम्ही परस्पर संमतीने अर्ज करून लग्न केले आहे. आमचे कोणी नाही, त्यामुळे आम्ही एकमेकांचा आधार बनण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.एकमेकांचा आधार बनण्याचा निर्णयवऱ्हाडी बनलेले सेवानिवृत्त पीडब्ल्यूडी अधिकारी एसपी जोशी यांनी या जगात आपले कोणीच नसल्याचे सांगितले. त्यांना 28 हजार रुपये पेन्शन मिळते. विभाही विधवा झाल्यामुळे निराधार आहे. तिची अवस्था पाहून त्याने स्वतःच्या आनंदासाठी नाही तर तिच्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी विभा जोशी यांनी आधारासाठी लग्न करत असल्याचे सांगितले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यास आत्महत्या करू, असेही त्याने सांगितले.

 

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश