शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

देशात ८१ लाख किशोरांचे झाले लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:41 IST

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातेत सर्वाधिक

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात १५ ते १७ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मात्रा देण्याची मोहीम सोमवारी सुरू झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या सोमवारच्या संख्येच्या तुलनेत दोनपट झाली. त्यात महाराष्ट्रातील ४.३ लाख मुलांचा समावेश आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत देशात १५ से १७ वयोगटातील ८१.५ लाखांपेक्षा जास्त मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. गुजरातेत १०.७२ लाख मुलांनी लस घेतली. मंगळवार संपताना ही संख्या मध्य प्रदेशमध्ये ९.७८ लाख, कर्नाटकमध्ये ७.७३ लाख आणि उत्तर प्रदेशमध्ये ४.३१ लाख झाली. महाराष्ट्रात ४.२६ लाख, बिहारमध्ये ४.०९ लाख, पश्चिम बंगालमध्ये २.७३ लाख मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली.

आकडे बोलतात...n    मंगळवारी ३९.८५ लाख मुलांनी कोविन पोर्टलच्या माध्यमातून नावे नोंदवली होती. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात एकूण १४७.६६ कोटी लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. त्यात ८६.०६ पहिली तर ६१.६० कोटी दुसरी मात्रा आहे.n    आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण १३.५५ लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत. राज्यात ५.४५ कोटी लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. ८.०९ कोटी लोकांनी दुसरी मात्रा घ्यायचीआहे.

देशात ५०० हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची बाधादेशातील विविध महाविद्यालयांत शिकणारे वैद्यकीय विद्यार्थी तसेच रुग्णालयांतील डॉक्टर असे मिळून सुमारे ५०० जणांना गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय अनेक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे यांतील विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने पालक घाबरून गेले.

केजरीवाल बाधित होताच नेत्याचे वादग्रस्त ट्विटदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, भाजपचे दिल्लीतील नेते कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोरोना संसर्गाचे राजकारण केले आहे. तुम्ही गाेवा, पतियाळा, लखनाैमध्ये जाऊन पाप करून आला आहात. तुम्ही आता सुपर स्प्रेडर आहात, असे ट्विट त्यांनी केले.  केजरीवाल नुकतेच गाेवा, पंजाब व उत्तरप्रदेशचा दौरा करून परतले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस