Vande Bharat Express Train News: आताच्या घडीला चेअर कार वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन यांना प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले, तरी याचा १०० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच देशातील काही चेअर कार वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. देशातील काही चेअर कार वंदे भारत ट्रेन २० कोचच्या केल्या जात आहेत. तर २४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याची योजनाही रेल्वेकडून आखली जात आहे. यातच पुढील काही वर्षांत तब्बल ८०० वंदे भारत ट्रेन बांधून प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा संकल्प भारतीय रेल्वेचा आहे.
वंदे भारत ट्रेन आणि हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या सुरक्षिततेवर आधारित विशेष प्रशिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पटना येथे सुरू झाले. तज्ज्ञांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाने २०३० पर्यंत ८०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (IRIMEE), जमालपूर आणि आयआयटी पटना सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील हे सहकार्य भविष्यातील गरजांना अनुकूल असलेले कुशल, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणारे कार्यबल तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
अत्याधुनिक ट्रेनवर लक्ष केंद्रित करण्यावर भर
वंदे भारत आणि नमो भारत (रॅपिड रेल) सारख्या अत्याधुनिक ट्रेनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगत प्रणाली आणि सहाय्यक प्रणाली, संगणकीकृत ब्रेकिंग प्रणाली आणि स्वयंचलित प्रणालींनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षणादरम्यान, सहभागींना हाय-व्होल्टेज विद्युत प्रणाली, सुरक्षा मानके, जोखीम व्यवस्थापन आणि ऑपरेशन आणि देखभालीतील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचे सखोल व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञान प्रदान केले जात आहे. आधुनिक ट्रेनचे सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम ऑपरेशन सुनिश्चित करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेच्या विविध झोनमधून निवडलेले २५ अधिकारी यामध्ये सहभागी होत आहेत. मध्य रेल्वे (मुंबई), पूर्व रेल्वे (कोलकाता), पूर्व मध्य रेल्वे (हाजीपूर), पूर्व किनारी रेल्वे (भुवनेश्वर), उत्तर रेल्वे (नवी दिल्ली), उत्तर मध्य रेल्वे (प्रयागराज), उत्तर पूर्व रेल्वे (गोरखपूर), ईशान्य सीमांत रेल्वे (गुवाहाटी), उत्तर पश्चिम रेल्वे (जयपूर), दक्षिण रेल्वे (चेन्नई), दक्षिण मध्य रेल्वे (सिकंदराबाद), दक्षिण पूर्व रेल्वे (कोलकाता), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (बिलासपूर), दक्षिण पश्चिम रेल्वे (हुबळी), पश्चिम रेल्वे (मुंबई) आणि पश्चिम मध्य रेल्वे (जबलपूर) या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Web Summary : Indian Railways plans to introduce 800 Vande Bharat trains. Both chair car and sleeper versions are popular, with some chair cars expanding to 20 coaches. Training focuses on high-voltage safety for this modern fleet.
Web Summary : भारतीय रेलवे ने 800 वंदे भारत ट्रेनें शुरू करने की योजना बनाई है। चेयर कार और स्लीपर दोनों ही लोकप्रिय हैं, कुछ चेयर कारें 20 कोच तक बढ़ रही हैं। प्रशिक्षण इस आधुनिक बेड़े के लिए उच्च-वोल्टेज सुरक्षा पर केंद्रित है।