शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शाहांवर नामुष्की! 'ते' ८०० हिंदू पाकिस्तानात परतले; भारताकडून मोठा अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:22 IST

'त्या' ८०० हिंदूंना पाकिस्तानला जावं लागलं; पाकिस्ताननं भारताची बदनामी करण्यासाठी वापरलं

 जयपूर/नवी दिल्ली: भारताकडून नागरिकत्व न मिळाल्यानं पाकिस्तानातून आलेले ८०० हिंदू नागरिक पुन्हा पाकिस्तानला गेले आहेत. भारताकडून अपेक्षाभंग झाल्यानं हिंदू नागरिकांवर पाकिस्तानला परतण्याची वेळ आली. सीमांत लोक संघटनेनं ही माहिती दिली. या प्रकरणी ऑनलाईन यंत्रणेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली.

शेजारच्या देशांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल अशी घोषणा मोदी सरकारनं केली होती. त्यामुळे अत्याचार सहन करत असलेले पाकिस्तानातील शेकडो नागरिक भारतात आले. यातील जवळपास ८०० पाकिस्तानी हिंदू पुन्हा पाकिस्तानाल गेले आहेत. हे नागरिक २०२१ मध्ये भारतात आले होते. भारताचं नागरिकत्व लवकर मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र कित्येक महिने उलटूनही नागरिकत्व न मिळाल्यानं ८०० पाकिस्तानी हिंदूंना पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं. हे ८०० हिंदू नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थानात राहत होते.

नागरिकत्वासाठी अर्ज करूनही कित्येक महिने काहीच न झाल्यानं ८०० नागरिक पाकिस्तानला परत केले. ते परतल्यावर पाकिस्तानच्या यंत्रणांनी त्यांचा भारताविरोधात वापर केला. त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आलं. भारतात अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली.

शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकारनं २०१८ मध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बुद्धिस्ट यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासाठी गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमधील १३ जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते.