शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 13:19 IST

देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत

ठळक मुद्देइंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेतज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतातकिंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात

बेंगळुरू, दि. 2 - देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.दरवर्षी इंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या कॉलेजमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात व सलग पाच वर्षे ज्या कॉलेजेसमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्या जात नाहीत, अशी कॉलेजं बंद व्हायला हवीत असा या शिखर संस्थेचा नियम आहे.बेंगळूरमध्ये एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी सहस्त्रबुद्धे आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाईटनुसार 2014-15 ते 2017-18 या कालावधीत देशभरातील सुमारे 410 इंजिनीअरिंग कॉलेजना बंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यातील 20 संस्था कर्नाटकमधील आहेत. 2016-17 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमधल्या संस्था जास्त प्रमाणात आहेत, ज्यांनी टप्प्या टप्प्याने कॉलेज बंद करण्याची अनुमती एआयसीटीईकडे मागितली आहे.

राज्यनिहाय खासगी इंजिनीअरिंग कॉलेजे, जी बंद होऊ इच्छितात

तेलंगणा - 64महाराष्ट्र - 59उत्तर प्रदेश - 47तामिळनाडू - 31हरयाणा - 31राजस्थान - 30आंध्र प्रदेश - 29गुजरात - 29 कर्नाटक - 21मध्य प्रदेश - 21पंजाब - 19

ज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात. टप्प्या टप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेता येणे. कॉलेजेचचा दर्जा, शिक्षणाचा नोकरी मिळण्यासाठी होणारा उपयोग ही या कॉलेजसमोरची महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हा ही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी विद्यादानाचे काम करतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील असे इंजिनीअर घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.