शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात २४ तासांत ८ अतिरेकी ठार; भारतीय जवानांनी ठोकलं 'शतक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:53 IST

दोन चकमकींचे यश : आयईडीचा स्फोट घडविण्याचा कट उधळला गेला; यावर्षी १०० अतिरेकी संपवले

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत आणखी सहा अतिरेकी मारले गेले. यामुळे मारल्या गेलेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. शुक्रवारी दोन अतिरेकी पुलवामा चकमकीत आणि चार अतिरेकी शोपियानमधील कारवाईत मारले गेले, असे अधिकारी म्हणाला.दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या पॅम्पोर भागातील मीज येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी गुरुवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्या भागाला त्यांनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला, तर इतर दोन अतिरेकी जवळच्या मशिदीत शिरले. संपूर्ण रात्रभर मशिदीभोवती सुरक्षादलाचे कर्मचारी होते. शुक्रवारी सकाळी सुरक्षादलांनी अतिरेकी बाहेर यावेत म्हणून अश्रुधूर सोडला. मशिदीचे पावित्र्य राखत सुरक्षादलांनी दोन अतिरेक्यांना ठार मारले.या कारवाईत एकूण तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेकी मशिदीबाहेर यावेत यासाठी ना गोळीबार केला गेला ना आयईडीचा वापर, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. संयम आणि व्यावसायिकता कामाला आली. गोळीबार किंवा आयईडीचा वापर न करता फक्त अश्रुधुराचा वापर केला. मशिदीचे पावित्र्य राखले गेले. मशिदीत लपलेले दोन्ही अतिरेकी मारले गेले, असे कुमार म्हणाले. शोपियानच्या मुनंद-बंदपावा भागात गुरुवारी सुरू केलेल्या अतिरेकीविरोधी कारवाईत शुक्रवारी सकाळी चार अतिरेकी मारले गेले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोधण्यात आले. २४ तासांत एकूण ८ अतिरेकी दोन चकमकींत मारले गेले. यावर्षी एकूण १०० अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला. हे खतरनाक अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तयबाशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमाराजम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी कोणतेही कारण नसताना तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकारी म्हणाला. सकाळी १०.४५ वाजता पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांतून नौशेरा सेक्टरमध्ये (राजौरी जिल्हा) मारा केला.नियंत्रण रेषेवरील जंगलात आगजम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील मानकोटे सेक्टरमध्ये जंगलात लागलेल्या मोठ्या आगीमुळे भूसुरुंगांचे स्फोट झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षादलांनी जमिनीत हे सुरुंग पेरून ठेवलेले होते.आमच्याकडे अतिरेकी आयईडीने हल्ले करणार असल्याची माहिती आली होती. पाकिस्तानी जैशचा कमांडर अदनान आणि कुलगाममध्ये वाहीद भाई होते. त्यांनी काही घातपात करायच्या आधीच आम्ही त्यांना नष्ट केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर