शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

Kerala Floods: ...अन् त्यानं खेळण्यांसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांना दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 12:06 IST

विद्यार्थ्यानं केरळमधील पूरग्रस्तांना केली साडे सात हजारांची मदत

गाझियाबाद : केरळमधील पूरग्रस्तांना गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एक 12 वर्षांच्या मुलानं मदतीचा हात दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या रबजोत सिंहनं खेळण्यांसाठी जमा केलेले पैसे केरळमधील पूरग्रस्तांना दिले आहेत. वृत्तवाहिन्यांवर केरळमधील पूरपरिस्थिती आणि त्यामुळे झालेली नागरिकांची दैना रबजोतनं पाहिली होती. वृत्तवाहिन्यांवर केरळमधील महापुराची दृश्यं पाहून रबजीत हळहळला आणि त्यानं मनी बँकमध्ये साठवलेले पैसे पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला.काल (सोमवारी) रबजोत सिंह त्याच्या आई-वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. त्यानं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे साडे सात हजार रुपये सुपूर्द केले. राजनगरमध्ये राहणारा रबजोत सिंह इयत्ता सातवीत शिकतो. त्यानं खेळणी खरेदी करण्यासाठी मनी बँकेत पैसे साठवले होते. मात्र केरळमधील विदारक स्थिती पाहून तो गदगदला आणि त्यानं पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलं. रबजोतनं त्याच्या मनी बँकेतील 7 हजार 470 रुपये अप्पर जिल्हाधिकारी (अर्थ आणि महसूल) सुनील कुमार सिंह यांच्याकडे सोपवले. 13 सप्टेंबरला रबजोत सिंहचा वाढदिवस असल्याचं त्याची आई सिमरननं सांगितलं. 'वाढदिवसाच्या निमित्तानं खेळणी खरेदी करण्यासाठी रबजोतनं पैसे साठवले होते. मात्र टीव्हीवर केरळमधील स्थिती पाहून त्यानं ते पैसे मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या संवेदनशीलतेचा आम्हाला अभिमान वाटतो,' असं सिमरन म्हणाल्या. रबजोतनं वयाच्या 12 व्या वर्षी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर