शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ईशान्येतील हिंसाचारापैकी ७७% घटना मणिपूरमध्ये; २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये घटना वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:46 IST

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या.

नवी दिल्ली : २०२३ या वर्षात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारापैकी ७७ टक्के घटना या एकट्या मणिपूरमध्ये घडल्या होत्या असे केंद्रीय गृह खात्याने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. मणिपूरमध्ये २०२२च्या तुलनेत २०२३ साली हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले, असे या अहवालात म्हटले आहे. 

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या. ३ मे २०२३ रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचाराचा भडका उडाला. त्यामुळे असंख्य लोक मारले गेले, जखमी झाले आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. 

गृह खात्याने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ हालचाली केल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या अतिरिक्त कंपन्या तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोन मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले. 

घडले ते खेदजनक, पण स्थिती सुधारेल- मणिपूरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत आहे. नवीन वर्षात राज्यातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मला आशा आहे. .- मणिपूरमध्ये जे घडले ते खेदजनक आहे. या वांशिक संघर्षात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. लोकांना आपले घरदार सोडावे लागले. या सर्व गोष्टींबद्दल मी जनतेची माफी मागत आहे, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी म्हटले.२५०हून अधिक लोकांचा मृत्यू - गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षात राज्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये आता घट झाली आहे. मे ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४०८ गोळीबाराच्या घटना घडल्या. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत ३४५ वेळा गोळीबार झाला. - मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसक घटना घडत असतात. त्या राज्यात मे २०२३पासून आजवर झालेल्या वांशिक हिंसाचारात २५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार