शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ऐकावं ते नवलच! ७५ वर्षीय शेतकऱ्याच्या खात्यात आले १ कोटी अन् बळीराजाचंच वाढलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 13:10 IST

७५ वर्षीय संदीप मंडल यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते.

बँक कर्मचाऱ्यांची एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढनंतर आता बिहारमधील एका शेतकऱ्याला देखील कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे रातोरात कोट्यवधी बनवले. येथील भागलपूरमधील गरीब शेतकरी रातोरात करोडपती झाला अन् एकच चर्चा रंगली. भागलपूरच्या एका गरीब शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये आले. मग बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्याचे खाते गोठवले. खरं तर ७५ वर्षीय संदीप मंडल यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते.

बँकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सांगितले की कुठून तरी खात्यात एक कोटी रुपये आले आहेत. या कारणास्तव खाते गोठवण्यात आले आहे. हे ऐकून संदीप मंडल यांचा मुलगा स्तब्ध झाला. तो घरी परतला आणि त्याने वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. ज्यांच्या खात्यात ही रक्कम आली ते शेतकरी संदीप मंडल यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने खात्यात एक कोटी रुपये असल्याचे सांगताच त्यांनी बँकेत धाव घेतली. बँक मॅनेजरकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की त्यांचे खाते गोठवण्यात आले आहे. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करा. तिथून अहवाल आल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल असे बँकेकडून सांगण्यात आले. 

बळीराजाचं वाढलं टेन्शन शेतकरी संदीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसबीआय बँक खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे येतात. एवढी मोठी कोटींची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय खात्यात वर्ग करण्यात आली आहे. ही मोठी रक्कम अचानक बँक खात्यात आल्याने गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. तसेच ते तणावात असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. 

तेलंगणा कनेक्शन असल्याची माहिती या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील कुमार पांडे यांनी सांगितले की, तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात सुमारे एक कोटी रुपये आल्याचे आढळून आले. याप्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातही एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची नोटीसही संबंधित बँकेला पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तेलंगणा पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलbankबँक