शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

७५ टक्के नागरिकांची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना पसंती दिवाळीचा उत्साह : मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

लातूर : पारंपरिक दिवाळीचा ट्रेंड आता बदलला असून, फराळ आणि कपड्यावरची दिवाळी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीत रुपांतर झाली आहे. गेल्या आठ दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली असून, प्रामुख्याने मोबाईल, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन / होमथिएटर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घरा-घरांत आता दिसून येत आहे.

लातूर : पारंपरिक दिवाळीचा ट्रेंड आता बदलला असून, फराळ आणि कपड्यावरची दिवाळी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीत रुपांतर झाली आहे. गेल्या आठ दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली असून, प्रामुख्याने मोबाईल, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन / होमथिएटर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घरा-घरांत आता दिसून येत आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानातील उपकरणांसोबत दिवाळी साजरी करण्याचा नवा लुक गेल्या काही वर्षांत रुढ झाला आहे. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी आपली दिवाळी या साहित्य खरेदीतून अपडेट केली आहे. हातातील स्मार्ट फोनमुळे स्मार्ट व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा दिवाळीनिमित्त अनेकांचा प्रयत्न असतो. बदलत्या तंत्रज्ञानाला सोबती म्हणून ही दिवाळी साजरी केली जात आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी येणारे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत. यातून जगणे सुस‘ होत असल्याने अनेकजण दिवाळी आणि विजयादशमीच्या मुहूर्तांवर या साधनांची खरेदी करतात. अल्पावधीत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये नवनव्या प्रोग्रॅमवर आधारित उपकरणांची कंपन्यांकडून निर्मिती केली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या एखाद्या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला नव्याने दाखल झालेल्या वस्तूने मागे टाकण्याचा पायंडा आता रुजला आहे. मोबाईलच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनव्या संशोधनावर क्रांती घडू लागली आहे. आज घेतलेला मोबाईल उद्या जुना वाटू लागला आहे. एवढे मोबाईल क्षेत्र अपडेट होताना दिसून येत आहे.
घरगुती उपकरणांना पसंती...
गृहिणींचे दैनंदिन जीवन सुस‘ करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात दाखल झालेल्या रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, फ्रीज आदी साहित्यांना महिला वर्गातून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही (एलईडी) आणि होम थिएटर या उपकरणांनाही मोठी मागणी आहे. ही उपकरणे घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जात आहे.
मोबाईल्सचे नवे लूक...
मोबाईलच्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे. सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षणा-क्षणाला अपडेट होत असल्याने मोबाईल्सचे नवे लूक दिवसागणिक बाजारात दाखल होऊ लागले आहेत. किमान १० हजार रुपयांपासून १ लाख रुपये किंमतीचे स्मार्ट फोन दाखल झाले आहेत. या स्मार्ट फोनमुळे पेपरलेस वर्क करणे सोयीचे ठरू लागले आहे. याही बाजारात दिवसाला कोट्यवधींची उलाढाल आहे.