शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के मतदान, 337 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 20:19 IST

शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झालं आहे.

शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केलं असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झालं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगानं 399 मतदान केंद्रांना संवेदनशील घोषित केलं होतं.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. धूमल, वीरभद्र आणि अनुराग ठाकूर यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. तर धूमल यांनी 60हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.हिमाचल प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत म्हणाले, धर्मशाळेत सर्वात जास्त 12, तर झंडुतामध्ये सर्वात कमी 2 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आलं होतं.37 हजार कर्मचा-यांना मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलं होतं. तर इतर राज्यांतील सीमेलगतच्या क्षेत्रातही निमलष्करी दलाच्या जवानांना निगराणीसाठी ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाचा दिवस आहे. मतदारांनी विनंती आहे की, मोठ्या संख्येनं मतदान करा, असंही मोदींनी ट्विट केलं आहे. 

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूक