शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणीने उघड केला ७० हजार कोटींचा महाघोटाळा! बिले गायब करून रेस्टॉरंट्सनी सरकारला लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:42 IST

हॉटेल व्यावसायिकांचा देशातील सर्वात मोठ्या डिजिटल घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.

हैदराबादमधील प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंट्सच्या साध्या तपासणीतून सुरू झालेली एक चौकशी आता देशातील सर्वात मोठ्या करचोरीच्या उघडकीचे कारण ठरली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगामध्ये बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून तब्बल ७०,००० कोटी रुपयांची करचोरी केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी असून यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी तिजोरीला कसा चुना लावला गेला, याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.

या प्रकरणाची पाळेमुळे शोधताना प्राप्तिकर विभागाच्या हैदराबाद युनिटने देशभरातील १.७७ लाख रेस्टॉरंट्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या एका विशिष्ट डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअरचा ६० टेराबाइट डेटा तपासला. अधिकाऱ्यांना संशय होता की, रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी आणि त्यांच्या प्राप्तिकर परताव्यामध्ये मोठी तफावत आहे. हा संशय खरा ठरवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिक टूल्सचा वापर करण्यात आला. तपासादरम्यान असे दिसून आले की, २०१९-२० या आर्थिक वर्षापासून आतापर्यंत या रेस्टॉरंट्सनी आपला कोट्यवधी रुपयांचा महसूल लपवून ठेवला आहे.

करचोरीसाठी रेस्टॉरंट मालकांनी अत्यंत हुशार आणि नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब केला होता. ग्राहक जेव्हा जेवणाचे बिल भरत, तेव्हा ते सर्व व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये नोंदवले जात. मात्र, नंतर सॉफ्टवेअरच्या बॅकएंडमधून कॅशमध्ये झालेले व्यवहार किंवा विशिष्ट दिवसांचे संपूर्ण बिलिंग रेकॉर्डच डिलिट केले जात असत. आकडेवारीनुसार, देशभरात अशा प्रकारे जवळपास १३,३१७ कोटी रुपयांची बिले सिस्टिममधून पूर्णपणे गायब करण्यात आली. काही ठिकाणी तर रेस्टॉरंट मालकांनी पूर्ण महिन्याचा डेटा साफ करून सरकारला अतिशय कमी कमाई दाखवल्याचेही समोर आले आहे.

या डिजिटल चोरीच्या प्रकरणात कर्नाटक राज्य सर्वात आघाडीवर असून तिथे सर्वाधिक बिले डिलिट करण्यात आली आहेत. त्यानंतर तेलंगणा आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच ५,१०० कोटी रुपयांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा अधिकाऱ्यांनी ४० रेस्टॉरंट्सची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली, तेव्हा तिथेच ४०० कोटी रुपयांची हेराफेरी सापडली. एकंदरीत व्यवहारांपैकी सुमारे २७ टक्के विक्री ही कागदोपत्री लपवली जात होती, ज्यामुळे सरकारला मिळणाऱ्या जीएसटी आणि प्राप्तिकरात मोठी घट झाली.

अहमदाबादमधील सॉफ्टवेअर कंपनीच्या सेंटरमधून डेटा मिळवून हैदराबादमधील डिजिटल लॅबमध्ये त्याचे विश्लेषण करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, ७०,००० कोटी रुपयांचा हा आकडा केवळ एका बिलिंग सॉफ्टवेअरच्या तपासणीतून समोर आला आहे. बाजारपेठेत अशा प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असून, त्यांची चौकशी केल्यास हा घोटाळा लाखो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, भविष्यात अशा प्रकारची डिजिटल करचोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Biryani uncovers ₹70,000 crore tax evasion by restaurants: Report

Web Summary : A probe into Hyderabad biryani restaurants revealed ₹70,000 crore tax evasion. Restaurants manipulated billing software, deleting records to hide revenue. Karnataka leads in deleted bills. Government investigates, promising stricter digital tax evasion measures.
टॅग्स :TaxकरCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल