शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
5
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
7
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
8
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
9
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
10
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
11
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
12
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
13
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
14
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
16
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
17
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
18
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
19
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
20
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर ते केनिया, अमूर ससाण्याचा ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास; सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पाहुणचार

By संतोष भिसे | Updated: November 30, 2024 12:29 IST

वन्यजीव संस्थेकडून टॅगद्वारे अभ्यास

संतोष भिसेसांगली : मणिपूरमधून दूरदेशीच्या प्रवासाला निघालेल्या अमूर ससाण्याने सांगली जिल्ह्यातही पाहुणचार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या ससाण्याने जिल्ह्यातील कडेगाव येथे दिवसभरासाठी विश्रांती घेतल्याची नोंद भारतीय वन्यजीव संस्थेने केली आहे.

वन्यजीव संस्थेने सॅटेलाईट टॅग लावलेला 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा मणिपूरमधून सोडला होता. त्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून प्रवास करत केनियापर्यंतचे स्थलांतर पूर्ण केले. यादरम्यान, तो कडेगावमध्येही थांबला. त्यानंतर गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश करून आफ्रिकेतील सोमालिया देश गाठला. १४ ते २७ नोव्हेंबर या १३ दिवसांत तब्बल ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. सध्या तो केनियामध्ये स्थिरावला आहे.अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन, आफ्रिका असे हजारो किलोमीटरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. यादरम्यान भारतात नागालॅण्ड आणि मणिपूरमध्ये विश्रांतीसाठी थांबतात. लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आणि या मार्गांवरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी टॅगचा उपयोग होतो.२०१६ पासून 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'च्या परवानगीने पक्षीशास्त्रज्ञ हा अभ्यास करीत आहेत. याअंतर्गत वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी ८ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये दोन अमूर ससाण्यांवर 'सॅटलाईट टॅग' बसवले होते. त्यामधील नर ससाण्याचे नाव 'चिऊलुआन-२' आणि मादीचे नाव 'गुआनग्राम' ठेवण्यात आले. स्थानिक गावांच्या नावावरून ही नावे ठेवण्यात आली आहेत.

असा केला प्रवास'चिऊलुआन-२' या ससाण्याने १४ नोव्हेंबररोजी प्रवास सुरू करून २७ नोव्हेंबर रोजी आफ्रिकेतील केनिया गाठले. प्रवास सुरू केल्यावर दुसऱ्याच दिवशी १५ नोव्हेंबर रोजी ओडिशामधील किनारी प्रदेश गाठला. तेथून तेलंगणामार्गे महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्रात कडेगावमध्ये थांबा घेतला. दुसऱ्या दिवशी गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश केला. समुद्रावरून थेट सोकोट्रा बेट गाठले. तेथून पूर्व आफ्रिकेतील सोमालिया प्रांतामध्ये प्रवेश केला. २७ नोव्हेंबर रोजी केनियामध्ये पोहोचला. हा सारा प्रवास त्याच्या पाठीवरील टॅगच्या मदतीने शास्त्रज्ञांनी नोंदविला. आता एप्रिल-मे महिन्यात आफ्रिकेतून त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल.

टॅग्स :Sangliसांगली