शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 20:55 IST

Seema Haider Love Story : आपण सचिनसाठी पाकिस्तानातलं सर्वकाही सोडून भारतात आलो आहोत, असा दावा सीमाने केला होता. पण...

आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात पळून आलेल्या सीमा हैदरची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही सीमा आणि सचिन चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्याशी संबंधित नव-नव्या स्टोरीज रोजच्या रोज समोर येत आहेत आणि लोकही त्यात रस घेत आहेत. सीमा भारतात पोहोचली तेव्हा तिच्यासोबत चार मुलंही होती. आपण सचिनसाठी पाकिस्तानातलं सर्वकाही सोडून भारतात आलो आहोत, असा दावा सीमाने केला होता. मात्र, आता तिच्या सासऱ्याने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सीमा भारतात काय-काय घेऊन आली? -आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सीमा हैदरचे सासरे मीर जान यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, सीमा सात तोळे सोन्यासह पाकिस्तानातून पळून गेली आहे. एवढेच नाही, तर आपल्या मुलाने (सीमाचा एक्स पाकिस्तानी पती) सीमाला सात लाख रुपये पाठवले होते, हे पैसेही ती घेऊन गेली, असा दावाही त्यांनी केला आहे. इकडे, सीमाला पोलिसांनी पकडले असता तिच्याकडून पाच स्मार्टफोन जप्त करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, सीमाकडे तीन आधार कार्डदेखील आढळले आहेत. एक आधारकार्ड सीमाचे स्वतःचे आहे. तर उरलेले दोन प्रत्येकी तिचे वडील आणि पतीचे आहेत.

काय म्हणाली सीमा? -यासंदर्भात बोलताना सीमा म्हणाली, मी सर्व दागिने गहाण ठेवून माझ्या पतीला परदेशात पाठवले होते. तसेच, पतीने पाठवलेल्या पैशातून आपण पाकिस्तानात एक घर खरेदी केले होते. एवढेच नाही, तर सचिनच्या प्रेमात पडल्यानंतर सीमाने भारतात येण्याचा विचार केला, तेव्हा तिने हे घर बारा लाख रुपयांना विकले. हेच पैसे वापरून ती पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आली, असा दावा तिने केला आहे.

सीमा अशी आली आले भारतात -खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टIndiaभारतPakistanपाकिस्तानhusband and wifeपती- जोडीदार