शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

7 हत्तींचा अचानक मृत्यू तर तिघांची प्रकृती चिंताजनक; विषारी सापाच्या जोडप्यावर संशय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 22:03 IST

7 हत्तींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

उमरिया- मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात 7 हत्तींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बांधवगड व्याघ्र अभयारण्यात आतापर्यंत 7 हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली. याप्रकरणी वनमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कडक कारवाई करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाजरी खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बांधवगड व्याघ्र अभयारण्यात 4 हत्ती मृतावस्थेत आढळले. त्यानंतर आता आणखी 3 हत्तींचा मृत्यू झाला आहे. हे हत्ती 13 हत्तींच्या कळपाचा भाग होते. तसेच, आणखी 3 हत्तींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन विभागाची टीम कळपातील इतर हत्तींवर लक्ष ठेवून आहे. अभयारण्याचे उपसंचालक म्हणतात की, बाजरी खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. पण, पोस्टमार्टमनंतरच नेमके कारण समोर येईल. 

हत्तींचा मृत्यू दुःखद आणि हृदयद्रावक : वनमंत्रीहत्तींच्या मृत्यूबाबत वनमंत्री रावत यांनी मंगळवारी रात्री प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले होते की, अभयारण्यातील हत्तींचा अकाली मृत्यू दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी गठित करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

साप आणि नागाच्या संबंधामुळे पीक विषारी झाले?येथील बाजरीचे धान्य पिकवणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांचे असे मत आहे की, शेतात सापाच्या जोडीने संभोग केल्याने पीक विषारी होते. हे पीक खाल्ल्यामुळे हत्तींचा मृत्यू झाला असावा.  आता सत्य काय आहे? विष नैसर्गित होते की, कुणी मुद्दाम टाकले, हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल. सध्या या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूsnakeसाप