शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

65th National Film Awards : श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:35 IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईमध्ये निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत त्या एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे निधन झाले. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. 

(मराठमोळ्या 'मयत' लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार; कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट)

तर,  65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत' हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. राजेंद्र जंगलेची 'चंदेरीनामा' बेस्ट प्रमोशनल फिल्म म्हणून निवडण्यात आलीय, तर 'मृत्यूभोग' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. 'म्होरक्या' या मराठी चित्रपटाला स्पेशल मेन्शन पुरस्काराचा मान मिळालाय, तर 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला 'न्यूटन' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडण्यात आलाय.

टॅग्स :65th National Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Srideviश्रीदेवी