शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नकुशी होतेय हवीशी; मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:41 IST

गेल्या तीन वर्षात दत्तक घेण्यात आलेल्या बालकांमध्ये 60% मुली

नवी दिल्ली: देशात लिंग गुणोत्तराचं प्रमाण फारसं चांगलं नसताना, स्त्री भ्रूण हत्येची समस्या कायम असताना मुलींबद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलत असल्याचा एक आशेचा किरण दिसून आला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली. त्यामुळे मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत असल्याचं अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे देशात आणि देशाच्या बाहेरुन अशा दोन्ही प्रकारांचा विचार केल्यास, मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांमधील देशातील दत्तक मुलांची आकडेवारी पाहिल्यास नकुशी हवीहवीशी झाल्याचं दिसून येतं. गेल्या तीन वर्षांमध्ये देशात 11,649 मुलं दत्तक घेण्यात आली. यातील मुलींची संख्या 6,962 होती. तर मुलांचं प्रमाण 4,687 इतकं होतं. 2015-16 मध्ये देशात एकूण 3,011 मुलं दत्तक घेतली गेली. यात मुलींची संख्या 1,855 होती. 2016-17 मध्ये 3,210 मुलं दत्तक घेतली गेली. त्यात मुलींचं प्रमाण 1,915 इतकं होतं. 2017-18 मध्ये 3,276 मुलं दत्तक घेण्यात आली. त्यात मुलींची संख्या 1943 होती. तर 2018-19 (डिसेंबर 2018 पर्यंत) देशात 2,152 मुलं दत्तक घेण्यात आली. यापैकी 1249 मुली होत्या. गेल्या तीन वर्षांचा विचार करता, दत्तक घेण्यात आलेल्या एकूण बालकांमध्ये मुलींचं प्रमाण जवळपास 60 टक्के आहे. याशिवाय देशाच्या बाहेरुनही मुली दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये 2,310 मुलं दत्तक घेण्यात आली. यातील 1,549 मुली होत्या. म्हणजेच देशाच्या बाहेरुन मुली दत्तक घेण्याचं प्रमाण 69 टक्के इतकं आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं लोकसभेत ही आकडेवारी मांडली. लोकसभा सदस्य तेज प्रताप यादव, एल. आर. शिवरामे गौडा आणि अंजू बाला यांनी विचारलेल्या प्रश्नांनंतर ही आकडेवारी मंत्रालयाकडून सादर करण्यात आली.  

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास