शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन मैत्रिणीकडून ६० लाखांचा गंडा, ३४ वर्षांचा व्यावसायिक अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 08:58 IST

आॅनलाईनवर मैत्रीण झालेल्या महिलेच्या नादी लागून ३४ वर्षांच्या व्यावसायिकाने तब्बल ६० लाख रुपये गमावले.

बंगळुरू : आॅनलाईनवर मैत्रीण झालेल्या महिलेच्या नादी लागून ३४ वर्षांच्या व्यावसायिकाने तब्बल ६० लाख रुपये गमावले. सायबर क्राईम पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्यावसायिक सतीशने (बदललेले नाव) डेटिंग वेबसाईटवर प्रोफाईल ओपन केले. १८ जुलै, २०१७ रोजी सतीश या वेबसाईटवर ‘शोम्पा७६’ असा आयडी असलेल्या महिलेच्या संपर्कात आला. तिने त्याला स्वत:ची ओळख कोलकाताची अर्पिता, अशी करून दिली होती. किरकोळ स्वरूपाच्या गप्पा झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांचे मोबाईल फोन क्रमांक देऊन व्हॉटस्अ‍ॅपवरही गप्पा सुरू केल्या. एकमेकांच्या फोटोंचीही देवाण-घेवाण झाली.

काही दिवसांनी अर्पिताने माझे वडील रुग्णालयात दाखल असून, मला ३० हजार रुपयांची गरज असल्याचे सतीशला सांगितले. त्याने तिच्या बँक खात्यात पैसे पाठवले. काही दिवसांनी अर्पिताने आणखी पैशांची विनंती त्याला केली. यावेळी तिने कोलकातातील बीएम बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये माझ्या वडिलांना दाखल केल्याचे कारण सांगितले. १५ डिसेंबर, २०१७ आणि २३ जानेवारी, २०१८ या कालावधीत सतीशने आणखी पैसे पाठवले. त्याने १९ लाख रुपये रूपाली मजुमदार हिच्या खात्यात, तर ४०.७ लाख रुपये कुशन मजुमदारच्या खात्यात पाठवले. जेव्हा अर्पिताने सतीशच्या फोन्सला व मेसेजेस्ला उत्तरे देणे थांबवले त्यावेळी सतीशला संशय आला.सायबर क्राईम पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारची फसवणूक फार काळापासून सुरू आहे. मॅट्रिमोनियल आणि डेटिंग वेबसाईटसमध्ये सायबर गुन्हेगार नातेसंबंधांसाठी (रिलेशनशिप) वयोवृद्ध किंवा वेगवेगळ्या झालेल्या स्त्री किंवा पुरुषांना शोधतात. हे गुन्हेगार स्वत:ला फार श्रीमंत कल्पक उद्योजक असल्याचे भासवतात व पीडितांची फसवणूक करून त्यांचे पैसे लुटतात, असे पोलीस अधिकारी म्हणाला.