शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आयोगाला ६ महिन्यांची मुदतवाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:56 IST

अन्य मागासवर्गीयांमध्ये उपवर्ग तयार करण्यासाठी या आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केली होती.

नवी दिल्ली : कोरोना साथीपायी लॉकडाऊन लागू केल्यामुळे अन्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजात खंड पडला होता. हे लक्षात घेऊन या आयोगाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आॅक्टोबर २०१७ मध्ये अन्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केंद्र सरकारने केली होती. अन्य मागासवर्गीयांमध्ये उपवर्ग तयार करण्यासाठी या आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केली होती.मात्र, या विषयावरील आपला अहवाल तयार करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आयोगाने सरकारकडे केली होती. मात्र, लॉकडाऊन लागू केल्याने आयोगाला या मुदतीतही आपले काम पूर्ण करता आले नसते. हे लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्य मागासवर्गीय आयोगाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.अवकाश संशोधनात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. विविध ग्रहताऱ्यांच्या संशोधनातही खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आवर्जून सहभागी करून घेतले जाणार आहे.यासंदर्भात अवकाश संशोधन खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, नव्याने स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अ‍ॅण्ड आॅथोरायझेशन सेंटरमार्फत (इन-स्पेस) अवकाश संशोधनात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यात येईल. याआधी देशात इस्रोकडूनच अवकाश संशोधन मोहिमा आखल्या जात.डेअरी, कुक्कुटपालन, मांस प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांना ३ टक्क्यांपर्यंत व्याजदरात सूट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार आहे. या उद्योगसुविधा उभारण्यासाठी व पशुसंवर्धनाकरिता १५ हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. देशातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच निर्यातीला प्रोत्साहन मिळावे व ३५ लाख नवे रोजगार निर्माण होण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.>‘सरकारने घेतले ऐतिहासिक निर्णय’देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच अवकाश संशोधनातील भारताचा सहभाग वाढविण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून काही ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशातील गावे, लघुउद्योजक यांना फायदा होईल, असे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOBCअन्य मागासवर्गीय जाती