शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 05:44 IST

तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.

चंद्रकांत कित्तुरेहैदराबाद : उत्तरेतील तीन राज्यांत भाजप विजयाची पताका फडकावत असतानाच तेलंगणात काँग्रेसने मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) तीनतेरा वाजविले. विधानसभेच्या ११९ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकत तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सत्ता संपादन केली. याचबरोबर सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचे केसीआर यांचे स्वप्नही धुळीस मिळविले. यामुळे भारत राष्ट्र समितीला देशपातळीवरील पक्ष बनविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही ब्रेक लागणार आहे.

कर्नाटकपाठोपाठ तेलंगणांमधील या यशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत मोठे बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या या विजयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि  तेलंगणाचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे. तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. त्यांनी दहा वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र  कालेश्वर धरण प्रकल्पावरून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि  प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष त्यांना भोवला.  भाजपने तेलंगणात आपल्या तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तरीही थोडेफार संख्याबळ वाढविण्या-इतपतच या पक्षाला यश मिळाले.

आश्वासनपूर्तीचे काँग्रेसपुढे आव्हानकर्नाटकप्रमाणेच काँग्रेसने तेलंगणातही निवडणूक जाहीरनाम्यात सहा हमी दिल्या होत्या. घरातील कर्त्या महिलेच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास ही महालक्ष्मी योजना, रयतू भरोसा योजनेअंर्तगत फाळ्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी १५ हजार, शेतमजुराला १२ हजार रुपये आणि भातपिकाला ५०० रुपये बोनस, गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक घरात २०० युनिट-पर्यंत मोफत वीज, इंदिराअम्मा योजनेअंतर्गत तेलंगणा चळवळीतील सैनिकांना २५० चौरस यार्डचा भूखंड, बेघरांना जागा व प्रत्येकी ५ लाख रुपये, युवा विकासम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५ लाखांचे विद्याभरोसा कार्ड, प्रत्येक मंडलामध्ये तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल, ज्येष्ठांसाठी दरमहा ४ हजार रुपये पेन्शन व १० लाखांपर्यंतचा राजीव आरोग्यश्री विमा या हमींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल.

रेवंथ रेड्डी विजयाचे शिल्पकारकाँग्रेसला बहुमत मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हेच विजयाचे शिल्पकार ठरले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही तेच असतील. रेवंथ रेड्डी यांना तेलंगणा राष्ट्र समितीने २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट नाकारले होते. यामुळे त्यांनी केसीआर यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती