शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एका दिवसात 6 जणांचा मृत्यू...! पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना? आली आहे व्हॅक्सीनचा बूस्टर घेण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:07 IST

देशभरात 594 नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे...

देशात पुन्हा एकदा कोरोन व्हायरल परततो की काय अशी धास्ती वाटू लागली आहे. कारण कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअंट अनेक नव्या सब-व्हेरिअंटमध्ये तयार झाला आहे. सर्वात नवा सब-व्हेरिअंट म्हणजे जेएन.1, यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते. देशात (भारतात) गुरुवारी कोरोनामुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यांपैकी तीन जण केरळमधील, दोन जण कर्नाटकातील, तर एक जण पंजाबातील आहे. याशिवाय देशभरात 594 नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, 'कोविड-19 हा गंभीर लक्षणे अथवा मृत्यूचे कारण होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या अधिकांश लोकांमध्ये केवळ हलक्या स्वरुपाची लक्षणे आढळत आहेत. अद्याप कोई ट्रेव्हल अडव्हायझरी जारी करण्याचा अथवा विमानतळांवर RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्याचा सरकारचा कुठल्याही प्रकारचा प्लॅन नाही. 

भारतासह अनेक देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात बोलताना तज्ज्ञांनी म्हटले आहे की, याला नवी लाट म्हणण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल. घाबरण्याचे कारण नाही. मात्र, याच वेळी, JN.1 हा कदाचित WHO चा शेवटचा 'व्हेरिअंट ऑफ इंटरेस्ट' नसेल, यामुळे सावध राहणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.बुस्टर डोस घेणं आहे आवश्यक? -कोरोना लस गंभीर आजारांपासून बचाव करण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र वेळेनुसार त्यांचा शरिरावरील परिणाम कमी होतो. बऱ्याच लोकांना कोरोना झाल्यानंतर अथवा किमान 2 डोस घेतल्यानंतरही ते दुसऱ्यांदा संक्रमित झाले आहेत. यामुळेच WHO ने JN.1 व्हेरिअंटला 'व्हेरिअंट ऑफ कंसर्न' घोषित केले आहे. अपोलो रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. एस. रामासुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, 'वृद्ध, रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोक आणि ज्यांना काही गंभीर आजार आहेत अशांना बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य