शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सुरतमध्ये गॅस गळती; 6 कामगारांचा मृत्यू, 20 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:36 IST

Surat Chemical Leak : या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सूरत : गुजरातमधील सूरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सचिन जीआयडीसी भागात केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लीक (Chemical Leakage) झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्याने त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक 362 च्या बाहेर 10 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून 10 मीटर अंतरावर मजूर झोपले होते.  या घटनेत जखमी झालेल्या 20 हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून केमिकल टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी केमिकल टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी केमिकलची गळती सुरू झाली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सचिन परिसरात अनेक केमिकल कारखाने आहेत. याआधीही गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात केमिकल वेस्ट टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Gujaratगुजरात