शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

टुथपीकच्या डीएनएमुळे ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण आणि हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 06:11 IST

उत्कृष्ट फॉरेन्सिक आणि शास्त्रोक्त तपासाच्या आधारे अलीकडेच गांधीनगर, गुजरात पोलिसांनी अपहरण, हत्येप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप मिळवली.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदाबाद : उत्कृष्ट फॉरेन्सिक आणि शास्त्रोक्त तपासाच्या आधारे अलीकडेच गांधीनगर, गुजरात पोलिसांनी अपहरण, हत्येप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप मिळवली.

२०१७ मध्ये नवनीत प्रकाशन प्रिंटिंग प्रेस ,गांधी नगर, गुजरातचे मालक नवीन शाह, यांचे अपहरण करुन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खंडणी मिळण्या  पूर्वीच अपहरण कर्त्यानी नवीन शाहची हत्या केली. त्यांचा मृतदेह वात्रक नदीत फेकून दिला. याप्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली होती. शाह यांच्या कडे पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच टीप दिल्याचे तपासात उघड झाले. या ८ पैकी ६ आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून अपहरण आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले इतर दोन आरोपी जामीन मिळवुन नंतर परदेशात पळून गेले. पोलिसांनी केलेल्या उत्तम तपास व शास्त्रोक्त पुराव्यांमुळे पोलिसांनी दोष सिध्द केला.

पोलिसांनी प्रत्येकाला गुन्ह्याशी जोडण्याचे आव्हान पेलताना मिळवलेले पुरावे:

आरोपी १ : गुन्ह्यात वापरलेली एसयूव्ही कार आरोपींपैकी एकाच्या मालकीची होती परंतु ती बनावट नंबर प्लेटने वापरली जात होती. खरी व बनावट नंबर प्लेट जप्त व मालकीची कागदपत्रे

आरोपी २ : कारमध्ये एक टूथ पिक सापडले. पोलीस पथकाने टुथपिकातून डीएनए नमुने घेतले. ते एका आरोपीच्या डीएनएशी जुळले.

आरोपी ३ : मृताला बांधण्यासाठी वापरलेले सेलोटेपचे उरलेले बंडल दुसऱ्या एका आरोपीकडून जप्त करण्यात आले. तपासणीत दोन्ही टेपचे नमुने जुळले.

आरोपी ४ : आरोपींपैकी एकाने मयताचे तोंडावर सेलोटेप चिकटवल्यानंतर ती दाताने कापली होती. आरोपीच्या तोंडाभोवती चीकटवलेल्या सेलो टेप वरील डीएनएचा नमुना दातांनी कापणाऱ्या आरोपीच्या डीएनएशी जुळला.

आरोपी ५ : तपास पथकाला एसयूव्ही कारच्या स्टिअरिंगवर एका आरोपीच्या बोटांचे ठसे मिळाले.

आरोपी ६ आणि ७ : तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपींकडून नवीन शाह यांची सोन्याची चेन आणि दुसऱ्याकडून पैशांचे पॅाकेट जप्त केले.

आरोपी ८ : कॉल रेकॉर्डच्या तांत्रिक विश्लेषणात टीप देणाऱ्या माजी कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाला.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी