शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

5G Launch in India: आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 11:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री देवुसिंह चौहान उपस्थित होते.

यावेळी त्यांना तीन टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवांचा डेमो दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी, एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल, व्होडाफोन आयडियाचे कुमार बिर्ला देखील होते. याशिवाय आकाश अंबानी यांनीदेखील पंतप्रधानांना 5G सेवांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित ट्रू 5G उपकरणे पाहिली आणि 'Jio-Glass' चा अनुभव घेतला.

आपण देशात 5G सेवा जरी उशिरा सुरू केली असली तरी देशभरात ती लवकर पूर्ण करणारे देश ठरणार आहोत. डिसेंबर २०२३ पर्यंत 5G ची चं जाळ संपूर्ण देशभरात पसवणार असल्याचं आश्वासन देत ही परवडणारी सेवा असेल असं आश्वासन अंबानी यांनी दिले. 

आज देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. मुकेश अंबानी यांनीही यावर्षी झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात त्याचे रोलआउट केले जाईल. पॅन इंडिया 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आज नव्या युगाची आज सुरूवात होत आहे. मुकेश अंबानी जसं म्हणाले त्याप्रमाणे 5G सेवांमुळे तरूणांसाठी अनेक संधी उपलब्ध होईल. आज आपल्याकडे असं नेतृत्व आहे जे तंत्रज्ञानाला समजतात याचा आम्हाला अभिमान आहे. हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ई ग्राम आणणारेही तेही होते. उद्योगांच्या पाठिंब्यासाठीही ते पुढे येतात. मुकेश अंबानींनी 4G सेवेलाही गती दिली. कोरोनाच्या काळातही तंत्रज्ञानामुळे आपण जराही थांबलो नाही, असं मत मित्तल यांनी व्यक्त केलं. आज आपला देश उत्पादनाचा देश बनतोय. पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडियाची घोषणा दिली. 5G मुळे येत्या काळात आणखी उद्योजक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्ली, वाराणसी, मुंबईसह काही शहरामध्ये आजपासूनच 5G सेवा उपलब्ध होईल आणि मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात ही सेवा सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.दीर्घ काळापासून होती प्रतीक्षा5G मुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढणारच आहे, पण याशिवाय उत्तम टेलिकॉम सेवा आणि कॉल कनेक्टिव्हीटीही मिळेल. यामुळे ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव घेता येणार आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर ही सेवा केव्हा सुरू केली जाणार याबाबत उत्सुकता होती. परंतु आता या सेवेची सुरूवात करण्यात आली आहे. संपूर्ण देशात ही सेवा सुरू होण्यासाठी काही काळ लागणार आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल देशात 5G सेवा सुरू करणार आहेत. परंतु व्होडाफोन आयडियानं मात्र सेवांबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMukesh Ambaniमुकेश अंबानीAkash Ambaniआकाश अंबानीReliance Jioरिलायन्स जिओ