शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाख स्थलांतरित पोचले गावी, ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 04:56 IST

केंद्र सरकारची कामगिरी : ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या सुमारे ५८ लाख स्थलांतरित मजुरांना श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत देशभरात ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थलांतरित मजुरांकरिता श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्याची राज्यांकडून होणारी मागणी आता घटत चालली आहे. पूर्वी रोज २५० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात होत्या. आता हीच संख्या १३७वर आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी देशात ५६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. दरम्यान, काही रेल्वेगाड्या ज्या ठिकाणी जायचे होते, त्या ठिकाणी न पोचता दुसऱ्याच ठिकाणी गेल्याचाही प्रकार घडला होता. अनेक भागातील मजुरांना वाहनेच न मिळाल्याने त्यांनी पायीच आपला प्रवास सुरु केला होता. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, श्रमिक विशेष रेल्वेगाडीने जाणाºया स्थलांतरित मजुरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रेल्वेने जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, कपडे, स्लीपर व अन्य जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या होत्या. जे स्थलांतरित मजूर पायी चालत गावाकडे निघाले होते, त्यांना नॅशनल हायवेज आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) मदतीने श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन गावी पाठविण्यात आले.श्रमिकांचे लॉकडाऊनमुळे खूप हालकोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यावरील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेले स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या गावांकडे निघाले. त्यात त्यांचे खूप हाल होत असल्याने खूप आरडाओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने १ मेपासून श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. त्यातून ५८ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेMigrationस्थलांतरण