शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

56 वर्षानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवरचं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 11:33 IST

56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत केलं आहे

अहमदाबाद , दि.17- 56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत केलं आहे. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 10.30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते.

धरणाच्या लोकार्पणासह नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुलही फुंकणार आहेत. गेल्‍या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या नर्मदा महोत्सवाची सांगताही आज होईल. लोकार्पणानंतर पंतप्रधान डभोई येथे सभा घेणार आहेत. धरण लोकापर्ण सोहळा अहमदाबादपासून २०० किलोमीटवर आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले,' यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल.

या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.

या प्रकल्पाची पायाभरणी १९६१ साली झाली होती. अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली धरणाचे काम थांबवण्याचे आदेश १९९६ साली देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले. भारतातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने उद्यापासून काम करण्यास सुरुवात करणार आहे. सर्व काम पूर्ण होण्यास ५६ वर्षे लागण्याते हे विरळ उदाहरण असावे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारNitin Gadakriनितिन गडकरी